पिंपरी-चिंचवड

पीसीसीओईच्या टीम क्रेटॉसचे ऐतिहासिक विजेतेपद

CD

पिंपरी, ता. १९ ः देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक ‘फॉर्म्युला भारत २०२५’ या राष्ट्रीय पातळीवरील वाहन स्पर्धेत पीसीसीओईच्या ‘टीम क्रेटॉस’ने ऐतिहासिक कामगिरी करताना सलग चौथ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या संघाने विविध गटांत एकूण दहा पारितोषिके मिळविली.
कोईमतूर येथे वरील स्पर्धा झाली. टीम क्रेटॉसने गतिशील विभाग, सहनशक्ती, कार्यक्षमता, स्किडपॅड, प्रवेग, स्वयंचलन, खर्च व उत्पादन या गटांत प्रथम क्रमांक मिळवला; तर व्यावसायिक सादरीकरण गटांत तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट चालक पुरस्कार आणि सर्वात स्वच्छ कार्यशाळा पुरस्कार अशी एकूण दहा पारितोषिके पटकावली. या घवघवीत यशाबद्दल संस्थेतर्फे टीम क्रेटॉसचे सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले,‘‘फॉर्म्युला भारत स्पर्धेमध्ये संघटन, नियोजन, अभियांत्रिकी कौशल्य आणि सातत्यपूर्ण अचूक प्रदर्शन करीत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. नवसंशोधन, उत्कृष्ट तांत्रिक क्षमता आणि अपार जिद्द, नियोजन यामुळे पीसीसीओई टीम क्रेटॉसने सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकाविले. त्यासाठी त्यांना प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पीसीईटीच्या विश्वस्तांचे पाठबळ मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करताना विश्वस्त मंडळाला अभिमान वाटतो.’’
पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, टीम मार्गदर्शक डॉ. सागर वानखेडे व यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.

मेकॅनिकल, ई ॲण्ड टी.सी.चे विद्यार्थी
विजेत्या टीम क्रेटॉसमध्ये मेकॅनिकल विभागासह ई ॲण्ड टी.सी. विभागाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या ध्रुव भट, जी. आर. हरीकृष्णन, मनीश मैथी, यशवंत कांबळे, ऋतुराज पाटील, आदिनाथ केळकर, ऋषिकेश बारपांडे, ओम लोणकर, निर्भिक नवीन, राधा कराळे, रोहन पाटील, रोहित सावंत आदी विद्यार्थ्यांच्या समावेश होता. कर्णधार म्हणून इन्वेश सोनार याने काम पाहिले.

PNE25U91460

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT