पिंपरी-चिंचवड

संवाद नागरीकांचा

CD

धोकादायक झाड काढावे
प्राधिकरणातील विठ्ठल - रुक्मिणी उद्याना शेजारी सावित्रीबाई फुले महापालिका व्यायाम शाळेच्या इमारतीमध्ये मैदानावर ब्रह्मदत्त विद्यालय मतिमंद मुलांची शाळा भरते. शाळेच्या अगदी दरवाजासमोर एक झाड पूर्णपणे वाकलेले आहे. पावसामुळे ते कधीही पडू शकते व इजा होऊ शकते. हे वाकलेले झाड धोकादायक आहे. उद्यान विभागाने दखल घेऊन हे झाड काढून टाकावे.
- रावसाहेब कांबळे, प्राधिकरण
PNE25V21828

विकासनगरजवळ मोठा खड्डा
विकासनगर येथील शिंदे पेट्रोल पंप वॉशिंग सेंटर शेजारी कात्रज - देहूरोड बाह्यवळण मार्गाला लागूनच मोठा धोकादायक खड्डा पडला आहे. त्याची दुरुस्ती रस्ते विकास महामंडळाने केलेली नाही. त्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी.
- रवींद्र कदम, विकासनगर, किवळे
PNE25V21826

मासुळकर कॉलनीत कचरा
पिंपरी येथील मासुळकर कॉलनी परिसरातील मनीष गार्डन सोसायटी, स्वप्ना नगरीमधील पदपथावर राडारोडा पडला आहे. सगळीकडे कचराच कचरा पडला आहे. पदपथाची दुरवस्था झाली आहे. त्यावर पाणी साचत आहे. त्याने डासांचा फैलाव होण्याची भीती आहे. महापालिकेने त्वरित दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.
- आदित्‍य देशपांडे, मासुळकर कॉलनी
PNE25V21829

पथदिव्यांवर केबल्सचे जाळे
आदित्य बिर्ला रुग्णालयासमोरील रस्त्यावर केबल्सचे जाळे असून पथदिव्यांचे खांब व झाडांवरून अशाप्रकारे केबल्स टाकण्यात आल्या आहेत. वारा वादळामुळे झाड, फांदी तुटली; तर अनर्थ होऊ शकतो. तत्पूर्वी संबंधितांनी सत्वर कारवाई करावी. ही अपेक्षा !
- शरद लासूरकर, थेरगाव
PNE25V21827

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT