पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत; पण सुरक्षेचे काय ?

CD

पिंपरी, ता. १६ ः शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवारपासून (ता. १६) सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे शाळेत औंक्षण करुन, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे शाळांचे आणि वाहन चालकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी सर्व वाहतूक नियम धाब्यावर बसून विद्यार्थी वाहतूक केली. त्यामुळे शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण कोणाचे ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
शहरात खासगी आणि महापालिकेच्या एकूण ६६५ प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी खासगी बस, स्कूल व्हॅनचा वापर केला जातो. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात ३ हजार १९५ स्कूल बसची नोंद आहे. त्या व्यतिरिक्त व्हॅन आणि रिक्षांमधूनही शालेय विद्यार्थांची वाहतूक केली जाते. शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या घटना लक्षात घेता परिवहन विभागाने सर्व शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक केले आहे. तसेच वाहनांना वाहन ट्रॅकिंग प्रणाली बसविणे बंधनकारक केले आहे. पण, सोमवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन आलेल्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे आढळून आले. तसेच शालेय वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थांची वाहतूक होत असल्याचे दिसले. त्यामुळे परिवहन विभागाने दिलेले आदेश शालेय वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी धुडकावून लावल्याचे दिसले. या प्रकरणी आरटीओ प्रशासन देखील गंभीर नसल्याचे दिसून येते. येत्या काळात विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित होणार का?, वाहतूक नियमांचे पालन होणार का?, आरटीओ कारवाई करणार का ? असे विविध प्रश्‍न उपस्थित होत आहे.

योग्यता प्रमाणपत्राचा अभाव
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात ३ हजार १९५ स्कूल बसची नोंद आहे. त्यापैकी दोन हजार ४८४ स्कूल बसचालकांनी योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) घेतले आहे. अजूनही सातशेहून अधिक स्कूल बस योग्यता प्रमाणपत्राशिवाय धावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचे दिसून येते.

PNE25V23125

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT