पुणे, ता. १६ : पिरंगुट येथील बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने तुटलेल्या वीज वाहिनीमुळे भूगाव, पिरंगूटसह परिसराचा वीजपुरवठा रविवारी दुपारी
बंद झाला होता. २४ तासानंतर सोमवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे.
पिरंगुट येथे ‘एमएसआरडीसी’च्या पुलाचे काम सुरु आहे. त्यासाठी संबंधित विभागाने भराव टाकून काम सुरु केले होते. रविवारी दुपारी पावसाच्या पाण्यामुळे टाकलेला भराव वाहून गेला. त्यामुळे २२ केव्ही स्कायआय वीज वाहिनी चार ठिकाणी तुटली. परिणामी साधारणत: २० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरवातीला बंद झाला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम सुरुच होते. परंतु संततधार पाऊस व वाहत्या पाण्यामुळे कामे करताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे काम थांबवून सकाळी पाणी कमी होताच पुन्हा कामाला सुरवात झाली.
सकाळी अकराला गणेशखिंडमार्गे भूगावचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे ८ हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला. सोमवारी दुपारी तीननंतर चारही जॉइंट जोडून सर्व स्कायआय वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांना यश आले.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.