पिंपरी-चिंचवड

ई-हेल्थ कार्ड योजना ‘कागदा’वरच

CD

पिंपरी, ता. ४ : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात यावी, यासाठी २०१० या वर्षापासून ‘ई-हेल्थ कार्ड’ प्रणाली सुरू करण्यात आली. एका खासगी कंपनीकडे या कार्डचे काम देण्यात आले. मात्र, २०२० पासून ‘वायसीएम’मध्ये पीव्हीसी स्मार्ट कार्ड स्वरुपातील हेल्थ कार्ड देणे बंद असून त्याऐवजी एका चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे. त्यामुळे रुग्णांची माहिती डिजिटल पद्धतीने जतन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, एका रुग्णाचे एकाहून अधिक ‘एमआरडी’ अर्थात ‘मेडिकल रेकॉर्ड डिपार्टमेंट’ क्रमांक तयार होत आहेत.

‘वायसीएम’मध्ये ई-हेल्थ कार्ड प्रणालीमुळे अचूक निदान, वैद्यकीय उपचार, रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे आहे. ही सेवा पूर्ण ऑनलाइन आहे. भविष्यात कितीही वर्षांनंतर रुग्ण उपचारासाठी आल्यास केसपेपर काढताना पहिल्यांदा ‘हेल्थ कार्ड’विषयी विचारणा करण्यात येते. त्या माध्यमातून डॉक्टरांना रुग्णांची पूर्व माहिती मिळते. त्यानंतर पुढील उपचार दिले जातात. त्यामुळे रुग्णांना ढिगभर कागदपत्रे बाळगावी लागत नाहीत. वेळेची बचत होते. सुरुवातीला नवीन कार्ड काढताना ३० रुपये आणि नंतरच्या उपचारासाठी दरवेळी दहा रुपये केसपेपरसाठी घेतले जात होते. मात्र, कोरोनाकाळात २०२० पासून हे हेल्थ कार्ड देणेच बंद करण्यात आले. आता टोकन क्रमांक लिहिलेल्या चिठ्ठीवर हे कार्ड प्रिंट करुन दिले जात आहे.

एक-एका रुग्णाचे २० कार्ड
हेल्थ कार्डवर रुग्णाचा ‘युनिक’ नंबर असतो. त्याला ‘एमआरडी’ नंबर म्हणतात. उपचारासाठी रुग्ण आल्यानंतर पहिल्यांदा केसपेपर काढला लागतो. त्यावेळीच रुग्णाला हेल्थ कार्ड चिठ्ठीवर प्रिंट करुन दिले जाते. या रुग्णाला दरवेळी आल्यानंतर ‘एमआरडी’ क्रमांक सांगितला, तरी टोकन मिळते. या मध्ये वैद्यकीय इतिहास जतन केला जातो. मात्र, ही चिठ्ठी गहाळ झाल्यास किंवा चिठ्ठीवरील शाई पुसल्यास रुग्णांना नवीन ‘एमआरडी’ क्रमांक काढवा लागतो. त्यामुळे एक-एका रुग्णांचे २० ‘एमआरडी’ क्रमांक तयार झाले आहेत. त्यामुळे त्या रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

हेल्थकार्ड प्रिंटर धूळखात
अगोदर हेल्थ कार्डसाठी ३० रुपये घेतले जात होते. आता हेल्थ कार्ड देणे बंद असल्याने केसपेपरचे २० रुपये घेतले जात आहेत. ‘पीव्हीसी हेल्थ कार्ड’साठी महापालिकेने खरेदी केलेल्या प्रिंटीग मशीन धूळखात पडून आहेत. होलसेल बाजारात अशा एका ‘पीव्हीसी स्मार्ट कार्ड’ची किंमत पाच रुपयांपेक्षाही कमी असताना महापालिका कार्ड खरेदी करण्याची तसदी घेत नाही. महापालिकेच्या या उदासीनतेमुळे नागरिकांना दर्जेदार सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे.

कोट
वायसीएममधील संपूर्ण कारभार पेपर व प्लॅस्टिकलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे हेल्थ कार्डसाठी प्लॅस्टिकचे स्मार्ट खरेदी करण्यात आलेले नाही. सर्व महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी सेंट्रलाइज डिजिटल प्रणाली सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ दिली नाही.
- डॉ. अभयचंद्र दोदेवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका

PNE25V03447

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT