पिंपरी-चिंचवड

निगडी भक्ती-शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो

CD

पिंपरी, ता. १० : पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असताना आता भक्ती-शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात ‘डीपीआर’ महामेट्रो प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील सुमारे ७५ टक्के भाग मेट्रो मार्गांशी जोडला जाणार आहे.
पिंपर चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या सुमारे तीस लाखांहून अधिक असून हा आकडा झपाट्याने फुगत आहे. त्यामुळे नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याची मागणी विविध संघटना आणि संस्थांकडून सातत्याने केली जात आहे. अखेर, नागरिकांचा मागणी लक्षात घेता निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे. हे अंतर सुमारे ३५ ते ४० किलोमीटर प्रस्तावित आहे.
या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग, तसेच भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी ‘कनेक्ट’ होणार आहे.

यापुढील अपेक्षित प्रक्रिया
- ‘डीपीआर’ला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाणार
- संबंधित आराखडा मान्यतेसाठी राज्य व नंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाईल.
- शासन मान्यतेनंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
- प्रकल्प मार्गी लागताच दररोजच्या वाहतूक कोंडीतून चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

येथे असतील ‘जंक्शन’
१) नाशिक फाटा : या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. येथून भोसरी, चाकण, शहरातील दापोडी ते निगडी मार्ग तसेच, पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे.
२) निगडी : भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्टेशन येथे जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसेच, भोसरी व चाकणला ये-जा करता येणार आहे.

असा आहे प्रस्तावित मार्ग
निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प स्टेशन- रावेत - मुकाई चौक - पुणे-मुंबई-बेंगळुरू महामार्ग - वाकड बायपास - पिंपळे सौदागर - पिंपळे गुरव - नाशिक फाटा - भोसरी - मोशी, चाकण असा हा मार्ग आहे.

निगडी-चाकण मेट्रोची आवश्यकता
१. पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारण्याची गरज
२. भक्ती-शक्ती चौक ते चाकण हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा
३. या मार्गावर मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ठरेल.
४. दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होईल

निगडी भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. राज्य आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून मान्यता मिळाल्यावर काम सुरू होईल. या प्रक्रियेसाठी किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो.
- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : ऑक्टोबर हिट गायब, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, ५ दिवस यलो अलर्ट

Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले

पहिल्यांदाच असे झाले! सोलापूर बाजार समितीत स्थानिक नव्हे परजिल्ह्यातील कांदा; नवा कांदा प्रतिक्विंटल 1200 रुपये तर जुन्या कांद्याला 2500 रुपयांपर्यंतच भाव

Marriage Numerology : कितीही भांडण-मनभेद झाले तरी 'या' मूलांकाच्या लोकांचं लग्न टिकतंच..! पाहा तुमचा मूलांक

Bihar Elections : जामिनावर असलेल्यांवर जनतेचा विश्वास नाही; यादव कुटुंबावर पंतप्रधान मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT