पिंपरी, ता. १४ ः ‘‘शैक्षणिक संस्थांनी शाळांमध्ये मानवी मूल्ये रुजविण्याचे कार्य करावे. विद्यार्थ्यांमध्ये भौतिक विकास साधण्यापेक्षा त्यांच्यात मानवतावाद निर्माण करून त्यादृष्टिने शिक्षण दिले पाहिजे,’’ असे आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘गौरवगाथा’ने शैक्षणिक संस्थांची प्रगती अधोरेखित केली आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांची जबाबदारी वाढली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
वाकड येथील हॉटेल टीपटॉप इंटरनॅशनलमध्ये ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘शैक्षणिक गौरवगाथा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन अनिल कवडे आणि लेखिका तथा अभिनेत्री विभावरी देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कवडे बोलत होते. ‘सकाळ’चे महाव्यवस्थापक रुपेश मुतालिक यावेळी उपस्थित होते.
कवडे म्हणाले, ‘‘मानवता निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त इमारती बांधून आणि वीजपुरवठा केल्याने विकास होत नाही. आपण एकमेकांचे दुःख समजून घेतले पाहिजे. आपल्यामध्ये मानवता जागृत झाली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, सदविचार आणि सद्भावना यांचा पाया घालण्याचे काम शिक्षण संस्थांनी करणे आवश्यक आहे. प्रत्येकानेच सामाजिक सौहार्द जपायला हवे.’’
‘सकाळ’चे वृत्तसंपादक धनंजय बिजले प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘सकाळ’ हे सकारात्मक पत्रकारितेचा मापदंड आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मागणी असलेले मराठी दैनिक आहे. वाचकांचे हक्काचे वृत्तपत्र असून दर्जा अतुलनीय आहे. नेहमीच सकारात्मक आणि रचनात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. समाजाला दिशा देणारी आणि लोकांना माहितीपूर्ण बनविणारी पत्रकारिता करण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न असतो.’’
साम टीव्हीचे निवेदक भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
गौरवशाली शैक्षणिक संस्था
अभंग इंग्लिश मीडियम स्कूल, अधिरा इंटरनॅशनल स्कूल, एंजल्स पब्लिक स्कूल, अॅपेक्स इंटरनॅशनल स्कूल, अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, भोर एज्युकेशन सोसायटी, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सीओईपीयन्स अॅकॅडमी, ज्ञानराज पब्लिक स्कूल, एज्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, ग्लोबल अचिव्हर्स स्कूल, हेलिओस इंटरनॅशनल स्कूल, जयहिंद शैक्षणिक संकुल, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, माउंट लिटेरा स्कूल, पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, पॅनजेमटेक इन्स्टिट्यूट, पीपल्स एम्पॉवरमेंट ग्रुप, फडतरे नॉलेज सिटी, प्रगती स्कूल, प्रियदर्शनी हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, राष्ट्रीय शिक्षण मंडळ, एस. पी. इंग्लिश मीडियम स्कूल, साई सकल शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ रूरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, स्कायजेट पायलट ट्रेनिंग अॅकॅडमी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड बिझनेस मॅनेजमेंट, दि पूना गुजराती केळवणी मंडळ, टिकाराम जगन्नाथ कॉलेज, यशोदीप अॅकॅडमी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.