पिंपरी-चिंचवड

एसटीच्या तीन टक्के तक्रारींचाच निपटारा

CD

एसटी प्रवाशांच्या तक्रारी कचरापेटीत
महामंडळाकडून फक्त तीन टक्के समस्यांची सोडवणूक

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एसटी) वर्षभरात १४ हजार १८० तक्रारी आल्या. त्यापैकी केवळ ५१३ तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेले हे महामंडळ प्रवाशांच्या तक्रारीच बेदखल करत असल्याचे चित्र आकड्यांवरून दिसत आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या सुमारे १४ हजार बसेसमधून दररोज सुमारे ४५ ते ४८ लाख जण प्रवास करतात. एसटीच्या विविध योजनांमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान, प्रवशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. टोल फ्री क्रमांकावर फोन करून, ई-मेल किंवा एसटीच्या संकेतस्थळावर हे प्रश्न मांडले जातात. पण, त्यांना न्याय देण्यात प्रशासकीय अधिकारी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाकडे येणाऱ्या तक्रारी
बसस्थानकातील शौचालये अस्वच्छ, बस वेळापत्रकानुसार नाही, ठरलेल्या थांब्यावर बस थांबत नाही, ऑनलाइन रिझर्व्हेशनचे पैसे परत मिळाले नाहीत, बस रस्त्यातच बंद पडणे (ब्रेक डाऊन), अस्वच्छता, चालक-वाहकाकडून असभ्य वागणूक आणि विविध गैरसोयी याबाबत प्रवाशांकडून तक्रारी नोंदवल्या जातात.

‘प्रवासी राजा दिन’ कागदावरच
एसटीची गुणवत्ता सुधारण्यासाठी महामंडळाने १५ जुलै २०२४ पासून ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम सुरू केला. यामध्ये प्रवासी, प्रवासी संघटनांना समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मांडता येतात. यावर आगार स्तरावरच तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना आहेत. मात्र, बहुतांश आगारांत हा उपक्रम सुरूच करण्यात आलेला नाही. तर, काही ठिकाणी प्रवाशांच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे ‘प्रवासी राजा दिन’ कागदावरच राहिला आहे.

महामंडळाची घोषणा फोल
प्रवाशांना त्यांच्या अडचणींबाबत थेट आगारप्रमुखांना संपर्क करता यावा, सर्व बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बसच्या आगारप्रमुख, स्थानकप्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षकांचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये घेतला होता. ही घोषणा करुन सात महिने उलटले, तरी तिची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही.

महामंडळाकडे आलेल्या तक्रारींची स्थिती
(कालावधी : एप्रिल २०२४ ते मार्च २०२५)
संकेतस्थळावर आलेल्या - १४,१८०
आपले सरकार पोर्टलवरील - १५९
तक्रार सोडवलेली प्रकरणे - ५१३
संबंधित विभागाला पाठविलेल्या तक्रारी - १,२३१
प्रलंबित - १२,४१२
----------
येथे मांडता येते तक्रार
संकेतस्थळ - https://msrtc.maharashtra.gov.in
फोन क्रमांक - १८००-२२१-२५०
ई-मेल आयडी - gmtraffic@msrtc.gov.in
-------
एसटी महामंडळाकडे प्राप्त तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करुन प्रवाशांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेश देतो.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT