पिंपरी-चिंचवड

वारीसाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक

CD

पिंपरी, ता. १९ ः महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला आणि लाखो वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. दोन्ही सोहळे पिंपरी-चिंचवड शहरातून मार्गस्थ होतील. शिवाय, पुण्यात सोहळे दोन दिवस मुक्कामी असतात. त्यामुळे पुढील दोन दिवस काही दिंड्या शहरात मुक्कामी असतील. या पार्श्‍वभूमीवर ‘सुरक्षित वारी, अखंड सेवा’ असा संकल्प महापालिका व अग्निशमन विभागाने केला असून, सात सदस्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख उपायुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीदरम्यान अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग २४ तास कार्यरत ठेवला आहे. वारी मार्गावर उच्चतम दक्षतेसह नियोजन केले असून आपत्कालीन परिस्थितीतत संपर्क करण्यासाठी ७७५७९६६०४ हा क्रमांक जाहीर केला आहे. वारीच्या काळात सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत. विजेच्या तारा, गॅस सिलिंडर किंवा आगीपासून दूर रहावे आणि कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती दिसल्यास तत्काळ वरील क्रमांकांवर माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केले आहे.

सज्ज पथक आणि यंत्रणा
- पालखी मार्गावर सात सदस्यांचे विशेष प्रशिक्षित पथक २४ तास नियुक्त केले असून, त्यामध्ये अनुभवी अग्निशमन अधिकारी, चालक व जवान यांचा समावेश
- पथकासोबत फायर टेंडर (अग्निशमन बंब), वॉटर टँकर, प्राथमिक उपचार किट, बचाव साहित्य (लाईफ रोप्स, स्ट्रेचर, कटर मशीन, पंप्स), जनरेटर, लाइटिंग सिस्टीम उपलब्ध

नियंत्रण आणि समन्वय
- अग्निशमन विभागाचा कंट्रोल रूम वारी दरम्यान घटनेच्या माहितीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सज्ज
- वारी मार्गावरील स्थानिक पोलिस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्वयंसेवी संस्थांसोबत निरंतर समन्वय साधला जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे आरएसएसशी मतभेद? संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, 'दोन्ही संघटना एकाच विचारसरणीच्या, पण...'

'हा कुत्रा खाऊन आलाय का, सारखा भूंकतोय!' इरफान पठाणने केली शाहिद आफ्रिदीची बोलती बंद; मग पुढे काय, झाला ना राडा...

Whatsapp Call Schedule : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं कॉल शेड्यूल फीचर, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Maharashtra News Updates : चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी पावसामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान

Pune : पुण्यात मद्यधुंद चालकानं डीसीपींच्या गाडीला दिली धडक, मुलगी जखमी; दोघांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT