शालेय जगत
एच. ए. स्कूल प्राथमिक
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) प्राथमिक शाळेत संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून ‘मी संविधान बोलतोय’ हे नाटुकले सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत संविधानाबद्दल माहिती देण्यात आली. नाटकाचे लेखन शहनाज हेब्बाळकर यांनी केले. यावेळी वेदांत चांदगुडे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत आला होता. प्रतिभा पोटघन यांनी मुलांना संविधान दिनाची माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.
मॉडर्न इंग्रजी
निगडीतील यमुनानगरमधील मॉडर्न हायस्कूल इंग्रजी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका गौरी सावंत यांच्या हस्ते संविधानाची प्रतिमा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाले. संविधानाचे वाचन शिक्षिका निलम देसाई यांनी केले. विद्यार्थ्यांनीही संविधानाचे सामुदायिक वाचन केले. यावेळी मुंबईतील झालेल्या दहशतवादी हल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख, शाळा समितीचे चेअरमन दीपक मराठे, पर्यवेक्षक डॉ. अतुल फाटक, मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी संविधान जागृती कार्यक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे नियोजन अक्षता पुरोहित, मोनाली पाटील, रसिका साळेगावकर, मधुकर रासकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले संस्था
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या सौ. जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय व सरकारमान्य माध्यमिक विद्यालयात ‘हस्ताक्षर प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘अक्षर लावण्य’ उपक्रमाच्या अंतर्गत नागराज मलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्ष जयश्री दिलीप निंबारकर तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयुष दिलीप निंबारकर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्नेहल पारखे यावेळी उपस्थित होते. कार्यशाळेत इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या उपक्रमामुळे अक्षर वळणदार काढण्याचे महत्त्व तसेच शुद्धलेखनातील साध्या चुका विद्यार्थ्यांना समजल्या. लेखनातील बारकावे, लेखनासाठी बैठक, लेखणी धरण्याची योग्य पद्धत, व्याकरण आदींचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले. याचा त्यांना उत्तरपत्रिका लेखनात फायदा होईल. शिक्षक गजानन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक हनुमंत जगदाळे यांनी आभार मानले.
रयत शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरीतील कन्या विद्यालयात विश्वबंधुत्व मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ज्ञानसाधना पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थिनी हा पुरस्कार कावेरी कोळी व मानसी तटकरे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांच्या पालकांसह वर्गशिक्षिका स्वाती भंडारे व दिनेश मोरमारे उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विद्यालयातील शिक्षिका रोहिणी काकडे व सुषमा कारंडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके होत्या. त्यांनी संविधानातील मूल्ये तसेच फुले दांपत्याच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला सीमा गांधी, प्रा. भारती जाधव, पौर्णिमा वानखेडे, प्रा. सायली गोसावी, बंधुता प्रकाशनचे बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे , ज्येष्ठ कवी शंकर अथारे उपस्थित होते.
कन्या विद्यालय
रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यार्थिनींनी संविधानाचे सामुदायिक वाचन केले.याप्रसंगी मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील वैशिष्ट्ये व महत्त्व यांची माहिती दिली. संविधान दिनानिमित्त विद्यार्थिनींनी संविधान जनजागृती फेरी काढली. यात संविधानाबाबत घोषणा, फलकसंदेशांद्वारे जनजागृती
करण्यात आली. विद्यालयात प्रश्नमंजूषा, चित्रकला आणि निबंध स्पर्धाही पार पडल्या. मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी व पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.