पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

पिस्तूल बाळगणाऱ्याला मॅगझिन चौकात अटक

पिंपरी : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला दिघी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई दिघीजवळील मॅगझिन चौक ते भोसरी रस्त्यालगत करण्यात आली. निखील बाबुराव पोतदार (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून पिस्तूल व काडतूस जप्त केले.

मेफेड्रॉन बाळगणाऱ्याला चिंचवडमध्ये अटक
पिंपरी : मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ बाळगणाऱ्याला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई चिंचवड येथील अण्णासाहेब मगर नगर येथे करण्यात आली. इस्तियाक इकबाल चौधरी (रा. अण्णासाहेब मगरनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून २२. २६ ग्रॅमचे मेफेड्रॉन, मोबाइल व इतर साहित्य असा एकूण दोन लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

कामाचे पैसे मागितल्याने मारहाण
पिंपरी : कामाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांना दोघांना अटक केली आहे. ही घटना मावळातील बेबडओहळ येथे घडली. या प्रकरणी राजीवकुमार ठाकूर (रा. बेबड ओव्हळ, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकी ढमाले व आयुष शरद ढमाले (दोघेही रा. बेबड ओव्हळ, ता. मावळ) यांना अटक केली असून विकी याच्या वडिलांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी यांनी आरोपीच्या घरी जाऊन कामाचे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना काठीने मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT