सकाळ संवाद इम्पॅक्ट
चिंचवडमधील चेंबरची दुरुस्ती
चिंचवडमधील जुना जकात नाक्याजवळील चेंबरची अखेर पूर्णपणे दुरुस्ती करण्यात आली. याबाबत ‘सकाळ संवाद’च्या माध्यमातून नुकतीच तक्रार केली होती. महापालिकेने याची दखल घेऊन दुरुस्ती केली. याबद्दल महापालिकेलाही धन्यवाद.
- रमेश पाटील, चिंचवड
E25V73837
निगडीमध्ये ‘स्टॉर्म वॉटर चेंबर’ची दुरुस्ती
निगडी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २७/अ मधील द्वारकामाई साई मंदिराजवळील पावसाळी वाहिनीवरील झाकण (स्टॉर्म वॉटर चेंबर) तुटले होते. साईबाबांचे मंदिर असल्याने तेथे भक्तांची सतत वर्दळ असते. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी ते दुरुस्त करावे, अशी मागणी ‘सकाळ संवाद’च्या माध्यमातून होती. त्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्याबद्दल ‘सकाळ’चे मनापासून आभार.
- सिराज बशीर शेख, निगडी
PNE25V73834
उद्यानात नवे ‘एलइडी’ दिवे
पिंपळे निलख येथील ‘माजी महापौर कै. प्रभाकर साठे पाटील उद्याना’च्या मध्यभागी असणाऱ्या वर्तुळाकार ‘शेड’मधील ‘एलइडी’ दिवे बंद होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबद्दल ‘सकाळ संवाद’च्या माध्यमातून दाद मागितली होती. याची दखल घेत नवे ‘एलइडी’ दिवे बसविण्यात झाले आहेत.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V73833
मोशीमध्ये खड्ड्याची दुरुस्ती
पुणे-नाशिक महामार्गावरील मोशीमधील मुख्य चौकात कामामुळे खड्डा पडला होता. गेल्या काही दिवसांपासून या खड्ड्यामुळे नागरिक, वाहनचालकांची गैरसोय होत होती. ‘सकाळ संवाद’च्या माध्यमातून हे निदर्शनास आणून देताच दुसऱ्या दिवशी दुरुस्ती करण्यात आली. त्याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद.
- संतोष शिंगाडे, मोशी
E25V73836
वडमुखवाडीत रस्त्याचे डांबरीकरण
चऱ्होली बुद्रूक येथील वडमुखवाडीतील अलंकापुरम मार्गावरील ओंकार लॉज समोर गुरू कृपा इंडस्ट्रीजजवळ उखडलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याचा धोका होता. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी आणि पुन्हा डांबरीकरण करावे, अशी मागणी आम्ही केली होती. ‘सकाळ संवाद’मधील या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. त्यामुळे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. जनतेच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने लक्ष दिल्याबद्दल ‘सकाळ’विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहे.
- निर्गुण थोरे, चऱ्होली बुद्रूक
PNE25V73843
तळेगावच्या स्मशानभूमीत ‘हाय मास्ट’ दिवे
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्मशानभूमीतील प्रकाशव्यवस्था मोडकळीस आली होती. आम्ही ‘सकाळ संवाद’च्या माध्यमातून दाद मागितली. त्यानंतर नगर परिषदेच्या प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून
‘हाय मास्ट’ दिवे बसवून प्रकाशासाठी उत्तम व्यवस्था केली आहे. त्याबद्दल तळेगाव दाभाडे नगरपालिका प्रशासनासह ‘सकाळ’ला धन्यवाद.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
NE25V73835