पिंपरी-चिंचवड

भाडेकरूंची माहिती मूळ घरमालकांनी द्यावी

CD

पिंपरी, ता. २५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या (पीएमआरडीए) गृहप्रकल्‍पात असणाऱ्या भाडेकरूंची माहिती मूळ घरमालकांनी द्यावी, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्‍या वतीने करण्यात आले आहे. सेक्‍टर १२ मधील अनेक सदनिका भाडेतत्वावर देण्यात आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्‍त झाल्‍या होत्या. त्या अनुषंगाने पीएमआरडीए प्रशासनाने हे आवाहन केले आहे. सोसायटीतील किती सदनिकांमध्ये भाडेकरू राहत आहेत, तशी माहिती कळवावी, असे पत्र गृहप्रकल्पातील प्रत्येक सोसायटीधारकांना काढले आहे.
पीएमआरडीएने उभारलेल्या गृहप्रकल्पात सदनिका या लॉटरीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत या घरांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, यापैकी अनेक सदनिकांचे वाटप केल्यानंतर सर्रासपणे भाड्याने दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पातील जवळपास ६० टक्क्यांहून अधिक सदनिका या भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. याबाबत वेगवेगळ्या सहकारी संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत पीएमआरडीएच्या अभियांत्रिकी आणि जमीन व मालमत्ता विभागाने बैठक घेतली. त्यानुसार भाड्याने दिलेल्या सदनिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणी सदनिकाधारकांना त्याच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती मागविण्यात आली आहे. पेठ क्रमांक १२ येथील फेज एक, फेज दोन या अंतर्गत सदनिकाधारकांनी सदनिका भाड्यांनी दिलेल्या आहेत. त्याची यादी तत्काळ अभियांत्रिकी विभागास कळवावी, असे पत्र सोसायाटीधारकांना पाठवले आहे. त्या अनुषंगाने संबंधित सदनिका धारकांना नोटीस काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ‘आयपीएल’वर सट्टेबाजीचे रॅकेट उघड, इचलकरंजीत सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT