पिंपरी-चिंचवड

दुबार शिधापत्रिकेसाठीचे हेलपाटे थांबले

CD

पिंपरी, ता. ८ : पूर्वीच्या तुलनेत शिधापत्रिका दुबार काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि जलद झाली आहे. शिधापत्रिका गहाळ झाल्‍यास अथवा इतर कारणांमुळे दुबार शिधापत्रिका (दुय्यम प्रत) काढण्याची आवश्यकता असलेल्या नागरिकांना आता तशी प्रक्रिया टाळता येणार आहे, कारण ऑनलाइन शिधापत्रिका सहजपणे प्राप्त होत आहे. त्‍यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील तीनही शिधापत्रिका कार्यालयांत दुबार शिधापत्रिका काढणाऱ्यांची संख्या घटली आहे.
पूर्वी प्रत्येक कार्यालयांतर्गत महिन्‍याकाठी २०० अर्ज शिधापत्रिकेच्या दुबार प्राप्‍तीसाठी येत होते. परंतु आता ही संख्या केवळ ७० वर आली आहे. या बदलाचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाइन पोर्टलवर शिधापत्रिका उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना एकाच क्‍लिकवर शिधापत्रिका मिळू शकते. नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका कशी डाऊनलोड करायची हे माहिती नसलेल्या काही नागरिकांनाच आता अधिक चौकशीसाठी कार्यालयाकडे येणे होत आहे. मात्र, या समस्येचे निराकरण कार्यालयामध्ये तत्काळ शिधापत्रिका देऊन केले जात आहे. राज्य सरकारच्या राज्य शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) पोर्टलवर नागरिकांना सहजतेने लॉगिन करून आपली शिधापत्रिका डाऊनलोड करता येत आहे. यावर संबंधित कार्यालयाकडून सही आणि शिक्का दिला जातो. त्यामुळे नागरिकांना त्यांची शिधापत्रिका त्वरित मिळते आणि त्यांना इतर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
या ऑनलाइन व्यवस्थेमुळे, ज्या नागरिकांना शिधापत्रिका गहाळ झालेली असते, त्यांना आणखी तासनतास कार्यालयाच्या बाहेर उभे राहण्याची गरज नाही. तसेच, कितीही वेळा शिधापत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना अधिक फायदेशीर ठरते. शिधापत्रिका काढण्याची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि त्वरित झाल्यामुळे सरकारी कामकाजात आणखी पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा संचार झाला आहे. यामुळे नागरिकांचे वेळेचे व आर्थिक नुकसान कमी झाले असून, सरकारी सेवा अधिक सुलभ बनली आहे.

‘‘आता दुबार शिधापत्रिका प्रक्रिया राहिलेली नाही. ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना स्‍वतःच आपले शिधापत्रिका काढण्याची सुविधा आहे. पूर्वी महिन्‍याकाठी १५० ते २०० दुबार शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्‍त व्‍हायचे. आता ६० ते ७० वर ही संख्या आली आहे.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय चिंचवड
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT