पिंपरी-चिंचवड

चऱ्होली फाटा-डुडुळगाव रस्त्याचा मार्ग मोकळा

CD

पिंपरी, ता. १२ ः महापालिकेच्या प्रारूप विकास योजनेतील चऱ्होली फाटा ते डुडुळगाव ३० मीटर रुंदी (डीपी) रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी डुडुळगाव गट क्रमांक १९०मधील ९११४.७४ चौरस मीटर क्षेत्र वन विभागाकडून हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यास स्थायी समिती सभेने मान्यता दिली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या ऑनलाइन उपस्थितीत स्थायी समिती सभा झाली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप आदी उपस्थित होते. पिंपरी चौकाजवळ माता रमाई पुतळा उभारण्यासाठी स्थापत्य विषयक कामे करणे, कामाच्या नावात बदल करणे, माता रमाई सृष्टीसाठी ब्राँझ म्युरल्स व पुतळा उभारणे; विविध अभ्यासक्रम व शिक्षकांचे मानधन; मतदार यादी व मतदान केंद्रांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करणे, गणेशोत्सवात स्थापत्य विषयक कामे करणे; महापालिकेच्या रुग्णालयांत दंत साहित्य खरेदी; जलनिस्सारणाची कामे, आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर भत्ता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वीजमीटर सुरक्षा ठेव, दिव्यांग दिन खर्च, हवा प्रदूषणाबाबत जनजागृती; इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन; साफसफाई साहित्य खरेदी, अग्निशमन केंद्रांसाठी उपकरणे खरेदी, वायसीएममध्ये उपकरणे खरेदी, कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करणे, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल बास्केटबॉल कोर्ट व स्केटिंग मैदान कराराने देणे, नवी दिशा शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रमांतर्गत वैष्णवी महिला बचत गटाच्या महिलांना इंदौर अभ्यास दौऱ्यावर पाठविणे आदी विषयांच्या खर्चासही मान्यता दिली.

अधिकाऱ्यांना पदोन्नती
विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतींना मान्यता दिली. यात मुख्य अभियंता-२ पदावर प्रमोद ओंभासे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना गांधी, डॉ. पद्मजा हवालदार आणि डॉ. रोहित पाटील; सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिल कोल्हे, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ विशाल कराळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदुरकर, कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट, सूर्यकांत मोहिते, सुधीर मोरे, उमेश मोने आणि रवींद्र सूर्यवंशी यांना पदोन्नती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

SCROLL FOR NEXT