पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

धोकादायक चेंबरची दुरुस्ती करावी
वल्लभनगर मेट्रो स्थानक उतरून बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील चेंबर उघडे अवस्थेत आहे. या उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या चेंबरचे झाकण व्यवस्थितरीत्या बसवावे.
- रमेश देव, चिंचवड
PNE25V77845

रिफ्लेक्टर खांबाची दुरवस्था
पिंपळे गुरव ते सृष्टी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने प्लॅस्टिक चे रिफ्लेक्टर खांब बसविले आहे. परंतु खांब बसवून आठच दिवस झाले असता त्यापैकी एक खांब वाकला गेल्यामुळे मोडकळीस आला आहे. यावरून या खांबांची गुणवत्ता लक्षात येते. महापालिकेने या समस्येची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी तसेच या खांबाची त्वरित दुरुस्ती करावी.
- नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
PNE25V77849

पाणी गळती थांबवावी
चिंचवड मार्गे पिंपरी कडे जाताना, गावडे पेट्रोल पंप परिसरात डाव्या बाजूस असलेल्या पाण्याच्या व्हॉल्व्ह मधून मागील अनेक दिवसांपासून पाणी गळती सुरु आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने या व्हॉल्व्ह ची तत्काळ दुरुस्ती करावी.
- नीलेश जाधव, चिंचवडगाव
: PNE25V77847

चेंबरचे झाकण दुरुस्त करावे
वाकड येथील भुजबळ चौक ते सखाराम चोखू वाघमारे अंडर पास रस्त्यावरून भुजबळ पुलाकडे जाताना डाव्या बाजूस चेंबर धोकादायक अवस्थेत आहे. या चेंबरचे झाकण खड्ड्यात पडले आहे, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या चेंबरची दुरुस्ती करून मजबूत झाकण बसवावे.
- सुनील डाके, बाणेर
25V77850

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT