पिंपरी-चिंचवड

प्रभागनिहाय मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध

CD

पिंपरी, ता. २० : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व तरतुदींचे पालन करून तयार केलेली प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी शनिवारी (ता. २०) प्रसिद्ध केली. ही अंतिम मतदान केंद्रांची यादी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील निवडणूक विभाग, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र कोणते आहे, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखत मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही अंतिम यादी तयार करण्यात आली असल्याचेही निवडणूक विभागातून सांगण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांसाठी अंतिम मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि मतदारांना सोयीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Investment News : १५ दिवसांत सोने २४ हजार तर चांदी १ लाख ४० हजारांनी उतरले; शेअर बाजारात मोठी उलाढाल शक्य

Saket Srinivasayya Death : कॅलिफोर्नियात सहा दिवसांपासून बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तपास सुरू, संशयास्पद मृत्यू

टीपू सुल्तानच्या अंगठीवर राम कोरलेलं, गांधी ते कलाम यांनीही टीपूबद्दल लिहिलंय; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

Mumbai Fire : मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! डोंबिवलीत भीषण आग; २९ दुचाक्या खाक, ५ जण जखमी

Latest Marathi News Live Update : भारताच्या विजयासाठी कानपूरमधील मंदिरात प्रार्थना

SCROLL FOR NEXT