पिंपरी-चिंचवड

भाजपच्या जागा थोड्या; गर्दी फार

CD

पिंपरी, ता. २४ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ‘अबकी बार १२५ पार’ अशी घोषणा देत भारतीय जनता पक्षाने ‘इनकमिंग’ सुरूच ठेवले आहे. गेल्या आठ दिवसांत अन्य पक्षांच्या २५ पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यात आला असून त्यांतील काहींनी प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून निवडणुकीसाठी तयारी केलेले पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्ते काय भूमिका घेतात? हे येत्या आठ दिवसांत कळणारच आहे. मात्र, जागा थोड्या आणि इच्छुक फार अशी स्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सुमारे ८०० इच्छुकांच्या मुलाखती घेऊन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे अहवाल पाठवला आहे. त्यानंतर अन्य पक्षातील काही माजी नगरसेवकांना मुंबईत, तर काहींना पिंपरीतील पक्ष कार्यालयात कार्यक्रम घेऊन प्रवेश देण्यात आले आहेत. ‘इनकमिंग’ झालेल्यांना तिकीट देऊ नये, यासाठी काही स्थानिक कार्यकर्त्यांनी एक दिवस आंदोलनही केले होते. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. या पक्ष प्रवेशावर ‘नाराज होऊन’ व ‘आपल्याला तिकीट मिळणार नाही’ या शक्यतेने एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या तुलनेत भाजपने पक्षात घेतलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांतील ‘माजीं’चा समावेश आहे.

जागा बघून पक्ष प्रवेश
महापालिकेची निवडणूक २०१७ च्या प्रमाणे चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी होत आहे. केवळ प्रभाग एक व बारा, प्रभाग सहा व सात आणि प्रभाग २४ व २५ यांतील अवघ्या काही भागांचा बदल वगळता प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा २०१७ च्या निवडणुकीत पराभव झालेल्या जागांचा विचार करून पक्ष प्रवेश दिल्याचे आणि त्या जागा मिळविण्यासह जिंकलेल्या जागा राखण्यासाठी रणनीती आखलेली दिसते. भाजपला २०१७ मध्ये प्रभाग ९, १२, १४ व २५ मधील एकही जागा जिंकली नव्हती. यांसह अन्य जागांवर लक्ष केंद्रित करून भाजपने पक्षप्रवेश दिलेले दिसतात.

अशी होती २०१७ ची भाजपची स्थिती
- एकूण जागा विजेते ः १२८ पैकी ७७ जागा
- चार जागा जिंकलेले प्रभाग ः २, ४, ६, ७, ११, १७, १९, २६, २७, २९, ३२ ः एकूण ११
- तीन जागा जिंकलेले प्रभाग ः ३, ८, १०, २३, ३१ ः एकूण ः ५
- दोन जागा जिंकलेले प्रभाग ः १, ५, १३, १५, १६, १८, २८ ः एकूण ः ७
- एक जागा जिंकलेला प्रभाग ः २०, २१, २४, ३० ः एकूण ः ४
(एकही जागा न जिंकलेले प्रभाग ः ९, १२, १४, २५)

अन्य पक्षांची २०१७ मधील स्थिती
- राष्ट्रवादी काँग्रेस ः प्रभाग ९, १२ मधील प्रत्येकी ४; प्रभाग २०, २१, २२, ३० मधील प्रत्येकी ३; प्रभाग ५, १४, १६, २८ मधील प्रत्येकी २; प्रभाग एक, तीन, आठ, १०, १३, १५, १८, २५ मधील प्रत्येकी १ जागा ः एकूण जागा ३६ (एकही जागा न जिंकलेले प्रभाग ः २, ४, ६, ७, ११, १७, १९, २७, २९, ३२)
- शिवसेना ः प्रभाग २५ मधील ३; प्रभाग १४, २४ मधील प्रत्येकी २; प्रभाग १५, १८ मधील प्रत्येकी १ ः एकूण जागा ः ९ (एकही जागा न जिंकलेले प्रभाग १ ते १३, १६, १७, १९ ते २३, २६ ते ३२ )
- मनसे ः प्रभाग १३ मधील १ जागा ः एकूण जागा ः १ (एकही जागा न जिंकलेले प्रभाग एक ते १२, १४ ते ३२)
- अपक्ष ः प्रभाग १, २२, २३, २४, ३१ ः एकूण जागा ः ५

काँग्रेससह अन्य पक्षाला एकही जागा नव्हती
काँग्रेससह बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लीमीन (एमआयएम), भारीप बहुजन महासंघ, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), समाजवादी पक्ष, भारतीय नवजवान सेना, रिपब्लिकन सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी या पक्षांनीही २०१७ महापालिका निवडणूक

लढवली होती. मात्र, त्यांना एकही जागा मिळाली नव्हती.

---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

निवृत्त बॅंक अधिकारी ६० लाखाला फसला! दागिने विकले, नातेवाइकांकडूनही पैसे घेतले, सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडले; आभाशी २ कोटी दिसले,‌ त्याचा टॅक्सही भरला, पण...

Nitin Gadkari: ''हत्येपूर्वी काही तास हमास प्रमुखांना भेटलो'', नितीन गडकरींनी सांगितला घटनाक्रम

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप आमदार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार

IPL २०२६ आधी आरसीबीच्या स्टार खेळाडूला मोठा धक्का! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, तुरूंगात रवानगी होणार?

SCROLL FOR NEXT