पिंपरी-चिंचवड

संवाद नागरीकांचा

CD

पदपथावरील साहित्य हटवा
वाकडमधील ओमेगा सोसायटीलगत स्व. आनंदराव बोडके मार्ग पदपथावर बांधकाम साहित्य, झाडांच्या फांद्या, बांबू व इतर साहित्य पडून आहे. पदपथावर घाण, कचरा आहे. त्यामुळे, पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड होत आहे. महानगरपालिकेने साहित्य हटवून स्वच्छता करावी.
- दिलीप बाफना, वाकड
PNE25V27121

बेकायदा होर्डिंगवर दंड लावा
रावेत रस्त्यावरील हे होर्डिंग एस.बी. पाटील शाळेजवळ नयासा प्रोजेक्टच्या विरुद्ध दिशेला लागले आहे. अशा प्रकारचे होर्डिंग पिंपरी चिंचवडमध्ये भरपूर ठिकाणी दिसतात आणि हे धोकादायक आहे. प्रशासनाने वेळोवेळी होर्डिंगचे परवाना क्रमांक आणि त्याची वैधता पाहून बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यावर त्वरित दंड लावावा.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE25V27123

चेंबरमधील मैलापाणी रस्त्यावर
पिंपळे गुरव येथील विद्यानगर गल्ली क्र.१ मध्ये १५ दिवसांपासून रस्त्यावर चेंबरमधून मैलापाणी वाहत आहे. महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु ते कर्मचारी केवळ बघून निघून गेले. रोज सकाळी हे गटार तुडुंब वाहत असते. नागरिकांना जाण्या-येण्यास कसरत करावी लागत आहे. लहान मुलांना याच पाण्यातून जावे लागते. दुर्गंधी देखील पसरली आहे. लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणून महापालिकेने ही समस्या त्वरित सोडवावी. ही विनंती.
- ग. शां. पंडित, पिंपळे गुरव
PNE25V27119

शिंदे वस्ती रस्त्याची दुर्दशा
रावेत पंपिंग स्टेशन ते शिंदे वस्ती रस्ता पावसामुळे चालण्याच्या लायक राहिला नाही. पदपथावर दुचाकी, चारचाकी उभ्या असतात. पादचारी केविलवाणे होत मार्ग काढत असतात. कोणी दखल घेईल काय?
- श्रीनिवास धोंगडे, शिंदे वस्ती
PNE25V27122

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT