पिंपरी-चिंचवड

चिंचवडेनगरात दगडोबा चौकात कचऱ्याचा ढीग

CD

चिंचवड, ता.१ ः चिंचवडेनगर येथील दगडोबा चौक हा सध्या कायमस्वरूपी कचऱ्याचा ढीग बनला आहे. सकाळ, दुपार व संध्याकाळी येथे सातत्याने कचरा टाकला जात आहे. त्याने रोगराई पसरण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.
मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला विनंती केली आहे की, दगडोबा चौकाची नियमित साफसफाई केली जावी, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. संध्याकाळच्यावेळेस या जागेवर काही दिवस एक कर्मचारी नेमावा, जेणेकरून पुढे कोणीही येथे कचरा टाकणार नाही. तसेच महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा तक्रारी व अर्ज दिले. तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो. त्यामुळे तिथे ‘कचरा टाकू नये’, ‘कचरा टाकला तर दंड केला जाईल’, अशा आशयाचे सूचना फलक लावणे गरजेचे आहे. परंतु जनसंवाद सभेमध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांना वारंवार सांगून देखील अजूनही फलक लावण्यात आलेले नाहीत. फक्त अधिकाऱ्यांकडून फलका संदर्भात पत्र दिले आहे, असेच वारंवार सांगितले जात आहे.


संपूर्ण रस्त्यावर तसेच आमच्या दुकानासमोर भाजीपाल्यांच्या हातगाड्या लागलेल्या असतात. संध्याकाळी हे विक्रेते त्यांचा कचरा तसेच इतरही सर्व कचरा तिथेच टाकतात. त्यामुळे रहिवाशांचे, विशेषतः लहान मुलांच्या आजारपणाचे प्रमाण वाढलेले आहे. तरी प्रशासनाने यावर ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे.
- सुनील नालकर, स्थानिक रहिवासी

दगडोबा चौकात वारंवार कचरा टाकला जातो. तेथे लवकरच उपाययोजना केल्या जातील. तसेच दंडा संदर्भातील नावाचे फलक देखील बसवले जातील. जेणेकरून लोक कचरा टाकणार नाहीत.
- भूषण शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
CWD25A01462

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT