सोमाटणे, ता. १ : संततधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतचा नाला बुजल्याने महामार्गाला ओढ्यासारखे स्वरूप आले आहे. परिणामी, वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.
मावळ परिसरात कालपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. संततधारेमुळे डोंगरदऱ्या आणि शेतातील पाणी वाहून आल्याने सोमाटणे येथील बाह्यमार्गाजवळील नाला पूर्णपणे बुजला आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असून, वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. उर्से टोलनाका ते किवळे पूल या दरम्यान रस्त्याला उतार असल्याने वाहने मोठ्या वेगाने जातात. मात्र, सोमाटणेजवळ पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अचानक वेग कमी करावा लागत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
रस्तेविकास महामंडळाच्या वतीने रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीने काही दिवसांपूर्वी नाल्यांची साफसफाई केली होती. मात्र, रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला पुन्हा बुजला असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
PNE25V27686
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.