पिंपरी-चिंचवड

संवाद नागरीकांचा

CD

पार्किंगचे नियम पाळावेत
रहाटणी येथील धर्मवीर संभाजी गार्डनच्या शेजारील रस्ता तसेच एसएनबीपी शाळेच्या बाजूचा रस्ता इथे पार्किंग सम आणि विषम तारखेला आहे. तरीही, नेहमी दोन्ही बाजूंना वाहने उभी केलेली असतात. संबंधितांनी या ठिकाणी लक्ष घालून सम व विषम तारखेच्या पार्किंग नियमाप्रमाणे वाहने उभी करावीत.
-चंद्रशेखर दाते, रहाटणी
PNE25V27704

चिखलामुळे अपघात वाढले
एनबी प्लाझा, रावेत परिसरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. तेथून येता-जाता वाहने घसरत आहेत. प्रशासनाने त्वरित उपया योजना करावी. रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण केल्यास भविष्यात येथे अपघात टळणार आहेत.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE25V27706

भुयारी मार्गातील पदपथ सुधारावा
वाकड परिसरातील सखाराम चोखू वाघमारे भुयारी मार्ग येथे वाहनांची खूप गर्दी असते. तेथील पदपथ मातीचा आहे. तो रस्ताही चढ-उताराचा आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना त्यावरून चालता येत नाही. महिला, मुले घसरण्याची भीती असते. त्यामुळे पादचारी मार्ग सपाट करावा. पाय निसटू नये, यासाठी खडबडीत फरशा बसवाव्यात.-
- सुनील डाके, बाणेर
PNE25V27703

सांस्कृतिक भवन आवारात श्वानांचा वावर
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील जिजामाता सांस्कृतिक भवनाच्या लॉबीत भटक्या श्वानांचा वावर असते. तेथे सुरक्षा रक्षक असूनही त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मागील दोन वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांनी थेट आयुक्तांपर्यंत ही अडचण सांगितली. पण, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. या वास्तूत ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, शासकीय कार्यालय, महिला व पुरुषांचे जिम आहे. दिवसभर नागरिकांचा वावर असतो. पण, भटक्या श्वानांमुळे तेथे जाणे-येणे धोक्याचे वाटत आहे.
- निशिकांत गोडबोले, संत तुकारामनगर
PNE25V27702

चेंबरमधील मैलापाणी रस्त्यावर
पिंपळे गुरव येथील विद्यानगर गल्ली क्रमांक १ मध्ये मागील पंधरा दिवसांपासून चेंबरमधून मैलापाणी रस्त्यावर वाहत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु ते कर्मचारी केवळ बघून गेले. दररोज सकाळी हे गटार तुडुंब वाहत असते. नागरिकांना जाण्या-येण्यास कसरत करावी लागत आहे. लहान मुलांना याच पाण्यातून जावे लागते. दुर्गंधीदेखील पसरली आहे. लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून महापालिकेने ही समस्या त्वरित सोडवावी.
- ग. शां. पंडित, पिंपळे गुरव
PNE25V2770

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT