पिंपरी-चिंचवड

अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवून मागितली सहा लाखांची खंडणी

CD

पिंपरी : अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवून ते डिलीट करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर येथे घडली. याप्रकरणी नेहरूनगर येथील एका ४१ वर्षीय व्यक्तीने संत तुकारामनगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अज्ञात अनोळखी मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांची मैत्रीण यांचे खासगी फोटो व व्हिडिओ काही अनोळखी मोबाईल नंबरवरून पाठवण्यात आले. त्यानंतर संबंधित फोटो व्हायरल न करता डिलीट करण्यासाठी सहा लाखांची खंडणी मागण्यात आली. संत तुकारामनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : महिलेला बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना निगडीतील श्रमिकनगर येथे घडली. कौस अब्दुल जब्बर शेख, अब्दुल जब्बर ऊर्फ सोनू हमीद शेख, परविन आस्लम शेख (सर्व रा. श्रमिकनगर, ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मुलाला आरोपी कौस अब्दुल जब्बर शेख हिच्या मुलाने दगड मारला. याचा जाब विचारल्याच्या कारणावरून विचारणा केल्याने वाद झाला. यामध्ये तिघांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परवीन हिने फिर्यादीच्या हाताला चावा घेतला. अब्दुल याने बांबूने मारहाण केली. तर कौस अब्दुल जब्बर शेख हिने दगडाने मारहाण केली. हे भांडण सोडविण्‍यासाठी फिर्यादीचे दीर आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे घडली. गणेश संजय सगळे असे या अपघातात मृत्‍यू झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. तर अंकित कुमार राकेश (वय ३०, रा. अटाली नगवा, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) या ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी योगेश संजय सगळे (रा. श्रीराम कॉलनी, गजानन महाराज नगर, दिघी) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे भाऊ गणेश सगळे हे कामावरून दुचाकीवरून घरी येत असताना आरोपी चालवत असलेल्‍या टेम्पोने गणेश यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने गणेश यांचा मृत्यू झाला.

दारू विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या विक्रीसाठी दारूसाठा जवळ बाळगणाऱ्या एकावर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चिखली, स्पाइन रोडवरील कृष्णानगर भाजी मंडई जवळ करण्यात आली. नीलेश कैलास अहिरे (वय ४३, रा. गजरे चाळ, दापोडी) असे गुन्‍हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याच्याकडे बेकायदारित्या विक्रीसाठी दारूसाठा बाळगला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी व विदेशी दारू आणि एक मोटार असा एकूण २ लाख ७० हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT