पिंपरी, ता. १ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) दक्षता अधिकारी अमोल तांबे यांची लातुर जिल्हा अधीक्षकपदी नुकतीच बदली झाली. त्यानंतर एक उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. राज्य शासनाने नुकतेच त्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. तर, दोन जण सेवानिवृत्त झाले आहेत. बदली झालेल्या रिक्त झालेल्या जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही.
‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागातील या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपायुक्त पदावर कार्यरत असलेले प्रमोद कुदळे यांची सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच तहसीलदार सचिन म्हस्के यांची प्रतिनियुक्तीची मुदत संपली आहे. त्यांची महाबळेश्वर येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. या पदांबरोबरच कार्यकारी अभियंता शीतल देशपांडे यांची शासनाच्या ग्रामविकास विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर स्नेहा हब्बू रुजू झाल्या आहेत. तसेच अनधिकृत बांधकाम विभागात असलेले अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता शशिकांत कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.