पिंपरी-चिंचवड

माल, प्रवासी वाहतूकदारांचा आजपासून संप

CD

पिंपरी, ता. १ : ‘ई-चलन’ कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईविरोधात मालवाहतूक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मालवाहतूक संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या असून अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच मालवाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे उद्योगनगरीतील कंपन्यांमधील उत्पादनासह आयात परिणाम होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरालगत चाकण, भोसरी आणि तळेगाव दाभाडे एमआयडीसी आहेत. शहरात वाहन, औषध निर्मितीसह इतर अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू आहेत. या उद्योगांना कच्चा माल, यंत्रसामग्री पुरवण्यासाठी रस्ते वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच शहरातून जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक आणि पुणे-बंगळूर हे राष्ट्रीय महामार्ग जातात. यावरून दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. या वाहनांवर सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणेद्वारे आधारित, तसेच वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अवास्तव दंड तसेच तांत्रिक अडचणींमुळे चुकीच्या नोटीस मिळण्याचे प्रकारही वाढले आहेत. या अन्यायकारक कारवाईविरोधात मालवाहतूक संघटनांनी बुधवारपासून बंदची हाक दिली. बंदमध्ये मालवाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध ३० संघटना सहभागी झाल्यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

शहरातील सर्वच संघटना मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. वाहनचालकांनाही आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच मालवाहतूक बंद ठेवणार आहोत.
- गौरव कदम, कार्याध्यक्ष, असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे

अनेकदा चुकीची कारवाई केली जाते. त्याचा परिणाम वाहनचालकांच्या आर्थिक व मानसिकतेवर होतो. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पण, याकडे शासनाने कायमच दुर्लक्ष केले. चक्काजाम आंदोलनात आमची संघटनाही सहभागी होणार आहे.
- उदय दळवी, अध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना

संघटनांच्या प्रमुख मागण्या
- ई-चलनाद्वारे आकारण्यात आलेले दंड माफ करावेत
- अन्यायकारक दंड वसुली सुरू आहे, ती थांबवावी
- अनेक शहरांमध्ये मालवाहतूक वाहनांना बंदी केली आहे याचा पुनर्विचार करावा
- मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर क्लिनर असावा, ही अट रद्द करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT