पिंपरी-चिंचवड

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ !

CD

श्रावण जाधव ः सकाळ वृत्तसेवा
मोशी, ता. १ : आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि खरा आध्यात्मिक सोहळा. सातासमुद्रापार मराठी कुटुंबांमध्ये तिची अनुभूती घेतली जात आहे. मागील ७० दिवसांत जगभरातील २२ देशांतून सुमारे १६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करुन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुका इंग्लंडमध्ये नुकत्याच दाखल झाल्या. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ! हा भाव ठेवत शेकडो मराठीजन तेथील दिंडी सोहळ्यात सहभागी झाले.
पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका १४ एप्रिल रोजी लंडनच्या दिशेने निघाल्या. त्यावेळी लंडनमधील विठ्ठलभक्त अनिल खेडकर यांच्याबरोबर मोशीमधील रहिवासी आणि सध्या इंग्लंडच्या लॅमिंग्टन स्पा (वार्विक)
इथे स्थायिक झालेले शरद कदम हे देखील उपस्थित होते. या पादुका आता २२ देशांतून प्रवास करून इंग्लंडमध्ये पोहोचल्या आहेत. इंग्लंडभर जिथे जिथे मराठी माणसे आहेत. त्या शहरात या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत. त्यानुसार वॉरिक येथील लॅमिंग्टन स्पा शहरामधील कॅम्पियन स्कूलमध्ये विठ्ठलाच्या पादुका रविवारी (ता. २९) दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन ‘लॅमिंग्टन मराठी’ संस्थेच्यावतीने करण्यात आले होते.

पालखी सोहळ्याचेही आयोजन...
सजविलेल्या पालखीमध्ये विठ्ठल - रुक्मिणीच्या पादुका व मूर्ती ठेवण्यात आल्या. सगळ्यात पुढे लहान मुलांनी विठ्ठल - रुक्मिणीची वेशभूषा केली होती. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, कपाळावर गंध, डोक्यावर टोपी आणि पारंपरिक वेश परिधान करून मराठी मंडळी कुटुंबासहित दिंडीमध्ये सामील झाली होती. पुढे शाळेच्या मोकळ्या मैदानात एक ‘रिंगण’ झाले. महिलांनी फुगड्या घातल्या. अभंग, गाणी याचा कार्यक्रम सुरू झाला. हरिपाठ झाला. लोकांनी पादुका दर्शन घेतल्यावर आरती झाली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


इंग्लंडमध्ये स्थायिक महाराष्ट्रातील भाविकांना आषाढी वारीसह विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची रुखरुख लागली होती. पंढरपूरहून आलेल्या पादुकांचा पालखी सोहळा, त्यांचे दर्शन घेऊन आम्हाला प्रत्यक्ष पंढरपूरची आषाढी वारी केल्यासारखेच वाटले. त्यामुळे यंदा पंढरीच्या वारीत सहभाग नसल्याची खंत थोडी फार कमी झाली.
- शरद कदम, लॅमिंग्टन स्पा (वार्विक) इंग्लड

PNE25V27756

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT