मुंबई, ता. १ ः राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) जागांवर होर्डिंग व डिजीटल जाहिराती देताना नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या संदर्भातील ओपो ट्रेडिंग जाहिरात परवाना घोटाळ्याचा मुद्दा चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोषींवर कठोर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन दिले.
टेकसिद्धी अॅडव्हर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२९ या कालावधीसाठी एसटीच्या जागांवर जाहिरात लावण्याचा परवाना दिला आहे. कंपनीने वार्षिक १२ कोटी २२ लाख २० हजार रुपये (जीएसटी वगळून) भाडे भरायचे होते. तथापि, मे ते डिसेंबर २०२४ या कालावधीत कंपनीने कोणतेही मासिक भाडे भरले नाही, परिणामी एसटी महामंडळाचे नऊ कोटी ६१ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले.
मंत्री सरनाईक यांनी विधानसभेत उत्तर दिले की, ‘‘संबंधित कंपनीने करारातील अटींचा भंग केला आहे. सध्या सव्याज थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीचे डिजीटल जाहिरातीचे अधिकार रद्द केले आहेत. शासनाने राज्यातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक केले आहे. त्यामुळे काही जाहिरातींना परवानगी नाकारली. संबंधित जाहिरात कंपनीने भाडे थकविले असून समाधानकारक उत्तरही दिलेले नाही. कंपनीने भाडेरक्कम न दिल्यास नऊ कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त केली जाईल. प्रसंगी कंपनीला काळ्या यादीत टाकले जाईल. आमदार जगताप यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे शासन गांभीर्याने पाहत असून लवकरच दोषींवर निर्णायक कारवाई होईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.