माळवाडी गाव रस्ता दुरुस्त करा
तळेगाव दाभाडेमधील माळवाडी गाव ते घोरावडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था खूप खराब झाली आहे. या रस्त्याचा वापर माळवाडी, कोटेश्वरवाडी आणि शेलारवाडीतील स्थानिक नागरिक, शेतकरी, दुधवाले, रेल्वेनी पुण्याला स्कूल-कॉलेजसाठी जाणारी विद्यार्थी, ऑर्डनन्स डेपो येथे येणारा कामगार वर्ग करतो. परंतु, पुण्यावरून चाकण एमआयडीसीला जाणारी येणारी व्यावसायिक वाहने सोमाटणे फाट्यावरील टोल नाका चुकविण्यासाठी या पर्यायी रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले आहेत. पायी देखील नीट चालता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर नवीन रस्ता व्हावा.
- गुलाब दाभाडे, तळेगाव दाभाडे
PNE25V27982
इंदिरा कॉलेजसमोर मोठे खड्डे
पुणे - बंगलोर रस्त्याच्या सेवा रस्त्याला इंदिरा महाविद्यालयाच्या समोर खूप मोठे खड्डे आहेत. प्रत्येक पावसात असे खड्डे पडतात आणि हे धोकादायक आहेत. कायमस्वरूपी प्रशासन काही करणार आहे का नाही ? जसे की रस्ते चांगले असावेत, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये. लोकांनी देखील जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनाचा वापर करावा.
- समाधान गायकवाड, वाकड
PNE25V27980
लिनिअर गार्डनमध्ये विजेचा अपव्यय
पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनच्या डोम आणि गार्डनमधील दिवे दुपारपर्यंत चालूच असतात. महिन्यापासून येथे मॉनिंग वॉकसाठी येणारे हे बघत असतात. तरी उद्यान विभागाने त्वरित कारवाई करावी. हा वीजेचा अपव्यय आहे. प्रशासनाने याबाबत टायमर लावून विजेची बचत करावी.
- रमाकांत दास, पिंपळे सौदागर
PNE25V27978
महिन्यभरापासून गटाराचे काम
गेल्या एका महिन्यापासून चिंचवडमधील शाहूनगरमध्ये गटाराचे काम सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या अर्धवट कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला राडारोडा पडलेला आहे.
- सोहन भोसले, शाहूनगर
PNE25V27977
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.