सोमाटणे, ता. २ : कासारसाई धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला असून, नदीची पूरस्थिती अकराव्या दिवशीही कायम होती. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा बाळबावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
कासारसाई धरणातील पाणीसाठा वाढल्याने तो नियंत्रित करण्यासाठी २२ जूनपासून विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे सांगवडे गावाजवळ कासारसाई नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. पावासाचा जोर आणखी वाढल्यास धरणाचा विसर्ग वाढवला जाणार असून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, किनाऱ्यावर जनावरे असल्यास बाजूला घ्यावीत. सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांनी केले आहे.
सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा १४.२१ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा १५.३३ दशलक्ष घनमीटर, 88 टक्के ठेवण्यात आला असून धरणातून ३४० क्युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.