पिंपरी-चिंचवड

आजचे क्राइम

CD

गुन्हे वृत्त
......................................
मोटारीखाली कुत्र्याला चिरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
एका वाहनचालकाने कुत्र्यावर गाडी घालून त्याला क्रूरपणे जखमी केले. ही घटना नवी सांगवी येथे सोमवारी (ता. ३०) सकाळी सव्‍वानऊच्‍या सुमारास घडली.
कुणाल भारत कामत (वय ४०, गणेश गार्डन, नवी सांगवी) यांनी मंगळवारी (ता. १) याबाबत सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. नितीन ढावळे (रा. चाकण) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने त्याचे वाहन पदपथाजवळ बसलेल्या एका कुत्र्याच्या अंगावर घातले. परत रिव्हर्स घेत पुन्हा डाव्या बाजूच्या मागच्या चाकाने कुत्र्याला चिरडले. यामुळे कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.
..
वाकडमधील सुरक्षारक्षकावर हल्ला
वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या मुख्य गेटजवळ पाच अनोळखी व्‍यक्‍तींनी मध्यरात्री सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काठीने हल्ला करत मारहाण केली. यामध्ये सोसायटीचा कॅमेरा फोडण्यात आला असून, खुर्च्यांचीही तोडफोड झाली आहे. ही घटना मंगळवारी (ता. १) मध्‍यरात्री साडेबारा ते एकच्‍या दरम्‍यान घडली.
परमेश्वर मळसिद्ध म्हस्के (वय ५०, रा. सुदर्शन कॉलनी नं. ५, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अज्ञात व्‍यक्‍तींविरोधात गुन्‍हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १ जुलै रोजी मध्यरात्री फिर्यादी, वॉचमन सुनील पाटील आणि बाऊन्सर शेखर जांभळे हे ग्लेनहॉक सिक्युरिटी एजन्सीमार्फत ड्यूटीवर होते. त्‍यावेळी पाच अनोळखी व्‍यक्‍तींची तेथे येऊन, ‘उद्या पुन्हा येथे ड्युटीला आलात, तर खल्लास करून टाकू.’’ अशा शब्दांत धमकी दिली. त्यापैकी एकाने लाकडी काठीने सोसायटीचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडला, तर उर्वरित दोघांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली. याच दरम्यान, रस्त्याजवळ थांबलेल्या इतर दोघांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली आणि चार-पाच प्लास्टिकच्या खुर्च्याही फोडून नुकसान केले. या हल्ल्यामुळे सोसायटी परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
--------------------
गाडी मालकांची एक कोटींची फसवणूक
चांगले भाडे देण्याचे आमिष देवून चारचाकी गाडी मालकांची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर २०२४ ते जून २०२५ दरम्यान आकुर्डी येथे घडला आहे. मानीश अशोकभाई हरसोरा (वय ३९, सध्या रा. आकुर्डी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत एक ५० वर्षीय नागरिकाने मंगळवारी (ता. १) याबाबत निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी मानीश याने फिर्यादी यांच्यासह इतर ९ जणांकडून ११ वाहने भाडेतत्‍वावर देण्‍यासासाठी करारनामा करून घेतली. ती वाहने गुजरात येथे नेली. वाहने भाडेतत्‍वावर न लावता, वाहनांचे ११ लाख ६८ हजार रुपयांचे भाडे न देता, तसेच ९० लाख रुपये किमतीची ११ वाहने देखील परत न देता सर्वांची एक कोटी एक लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली.
....
ज्येष्ठ महिलेची ९२ हजारांची फसवणूक
एका ६३ वर्षीय महिलेला इन्शुरन्सच्या नावाखाली ९२ हजार रुपयांना गंडविण्यात आले. ही फसवणूक ६ मे ते ७ मे दरम्यान निगडीतील प्राधिकरण परिसरात घडली. राहुल पांडे (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्राधिकरण, निगडी येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय महिलेने मंगळवारी (ता. १) याबाबत निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. तुमची पॉलिसी लॅप्‍स होणार असल्‍याचे सांगत त्‍यांच्‍याकडून फोन पेवरून ९२ हजार रुपये घेतले. त्‍या पैशाची पावती न देता, तसेच फोन बंद करून फसवणूक केली.
............
सततच्या वादातून पत्नीचा खून
पतीने आपल्‍या पत्‍नीचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. १) दुपारी दोनच्‍या सुमारास उघडकीस आली. भट्टी आळी, बावधन बुद्रूक येथील श्रीराम निवास इमारतीत हा प्रकार घडला.
प्रकाश नागनाथ जाधव (वय ४३, रा. श्रीराम निवास, बावधन बुद्रूक) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. प्रवीण प्रकाश जाधव (वय १८) यांनी बावधन पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेव्हा बेडरूममध्ये गेले, तेव्हा त्यांची आई बेशुद्ध अवस्थेत पाहिले. तिच्या गळ्यावर लालसर व्रण दिसले. वडील घटनास्थळावरून अॅम्ब्युलन्स आणण्याच्या बहाण्याने निघून गेले. त्यामुळे खून झाल्याचा संशय निर्माण झाला.

...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT