पिंपरी-चिंचवड

मालवाहतूक संपाला संमिश्र प्रतिसाद ‘एमआयडीसी’तील कंपन्यांमधील मालवाहतूक सुरळीत

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः ई-चलन प्रणालीतील अन्यायकारक दंडवसुली, क्लिनरची सक्ती, तसेच वाहनचालकांवर होणारा आर्थिक अन्याय याविरोधात मालवाहतूक संघटनांनी मंगळवारी (ता. १) मध्यरात्रीपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. त्याला पुणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही वाहनचालकांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, तर काहींनी संपाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनामुळे उत्पादन क्षेत्रावर परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, बुधवारी (ता. २) चिंचवड, चाकण, तळेगावसह अन्य एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये मालवाहतूक सुरळीत सुरु असल्याने संपाचा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.
राज्यातील मालवाहतूक संघटनांनी ई-चलन कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुरु असलेल्या दंडात्मक कारवाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. वाहन चालकही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुंबईसह काही भागात या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, पुणे जिल्ह्यात आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड शहरातील ट्रान्स्पोर्ट नगरीत ३०० हून अधिक वाहनचालकांनी वाहने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला तर पुण्यातील मार्केट यार्डातही मोठ्या संख्येने अवजड वाहने थांबली होती. पण, एमआयडीसी परिसरातील वाहन चालक मात्र या आंदोलनात सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. संपाच्या पहिल्या दिवशी उत्पादन क्षेत्रावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे उद्योजकांनी सांगितले.
-------
‘‘ई-चलन प्रणालीतील अन्यायकारक दंडवसुली आणि अवजड वाहनांवर क्लीनर सक्तीच्या निर्णयावर उत्तर प्रदेश सरकारने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारलाही निर्णय घेण्याचे स्वतंत्र आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्यांने विचार करावा. अन्यथा उद्यापासून आंदोलनाची व्याप्ती वाढेल.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना.

‘‘आजच्या संपामध्ये स्वेच्छेने ट्रक मालकांनी गाड्या उभ्या केल्या आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद केल्याने आमचे नुकसान होते. त्यामुळे इतर शहराला जाण्यासाठी पूर्ण शहराला वळसा घालून जावे लागते. महापालिका प्रशासन आणि सरकारने यातून त्वरित मार्ग काढावा.
- दिलीप देशमुख, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पुणे
--------
आंदोलनाच्या मागण्या :
- ई-चलनाद्वारे आलेले दंड माफ करावेत
- अन्यायकारक दंडवसुली त्वरित थांबवावी.
- अनेक शहरामध्ये मालवाहतूक वाहनांना बंदी केली आहे, याचा पुनर्विचार करावा
- मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर क्लीनर असावा, ही अट रद्द करावी
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT