पिंपरी-चिंचवड

धावत्या पीएमपी बसवर झाड कोसळून सात प्रवासी जखमी

CD

पिंपरी, ता. २ : पुणे - मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशनजवळ धावत्या पीएमपी बसवर रस्त्याच्याकडेचे भले मोठे झाड कोसळले. ही घटना बुधवारी (ता. २) सकाळी दहा वाजता घडली. त्यामध्ये बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अर्बन स्ट्रीट अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे झाड कोसळून दुर्घटना होण्याची ही दुसरी घटना आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी, चिंचवड, आकुर्डी परिसरात जुन्या पुणे - मुंबई महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर अर्बन स्ट्रीट अंतर्गत रस्ता सुशोभीकरण आणि पदपथ, सायकल मार्गिका तयार केली जात आहे. पिंपरी ते आकुर्डी दरम्यान याच कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे झाडांची मुळे उघडी पडली. सतत पडणाऱ्या पावसामुळे झाड रस्त्याच्या दिशेला झुकले आणि बुधवारी सकाळी धावत्या पीएमपी बस (एमएच १४/एनजी ५०३७) वर कोसळले. ही बस चिंचवड स्टेशन येथून निगडीच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन विभाग, पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. बसमधील जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT