पिंपरी, ता. २ : दापोडी येथे एका चारचाकीच्या अपघातात दोन दुचाकीचे नुकसान झाले असून, चालक जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. २) सकाळी अकराच्या सुमारास सीएमइ गेट समोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवीवरून पुण्याकडे जाणाऱ्या चारचाकीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरील दोन दुचाकींना धडक बसली. जबर मार लागल्याने दुचाकीवरील चौघांना ससून रूग्णालयात दाखल केले. तर चारचाकीच्या चालकासदेखील दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संबंधित घटनेची माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.