पिंपरी-चिंचवड

पहिल्या तिमाहीत ५२२ कोटी कर वसूल आयुक्तांकडून कर्मचा-यांचे कौतुक ः यावर्षी १२०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट

CD

पिंपरी, ता. २ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५२२ कोटी रुपयांची कर वसुली केली. या यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कर वसुली मोहिमेमधील १० कर्मचारी आणि तीन विभागीय कार्यालयांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, कर संकलन विभागाचे कार्यालय अधीक्षक चंद्रकांत विरणक आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘पहिल्या तिमाहीतच ५२२ कोटी रुपयांची वसुली करणे हे महापालिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या कार्यक्षमतेमुळे आम्ही या आर्थिक वर्षात १२०० कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य गाठू शकतो.’’
मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामकाज केल्यामुळे वाकड, चिखली, मोशी या विभागीय कार्यालयांसह सहायक मंडलाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. तसेच, आयुक्त शेखर सिंह यांनी फॉक्सबेरी टेक्नोलॉजी टीमचा सन्मान केला. सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन उपक्रमांतर्गत कर आकारणी व कर संकलन विभागामध्ये माहिती विश्लेषण, प्रभावी जनजागृती, घरपोच बिल वाटप यासह इतर कामांत फॉक्सबेरी टेक्नोलॉजी टीमने करदात्यांपर्यंत पोहोचण्यात मदत केल्याचे आयुक्तांनी नमूद केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.


कर संकलनात तीन विभागाचा उच्चांक
कर संकलन विभाग / कर वसुली
वाकड / ६५ कोटी ११ लाख
चिखली / ३९ कोटी ३५ लाख
मोशी / ३० कोटी ५३ लाख

------

गत दोन वर्षाच्या तुलनेत विक्रमी कर संकलन
२०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर संकलनात उल्लेखनीय वाढ दिसून आली. मात्र, १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला. यात ३ लाख २३ हजार २३९ नागरिकांनी तब्बल ३८० कोटींपेक्षा जास्त कर ऑनलाइन भरला आहे.

‘‘सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन उपक्रमांतर्गत डिजिटल माध्यम, डेटा विश्लेषण अधिक प्रभावी वापर, करजागरूकता मोहिमा, वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, तसेच प्रभागस्तरावर कार्यक्षम पथकांची स्थापना या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. नागरिकांना सुलभ सेवा देणे व त्यांचा विश्वास संपादन करणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

फोटो ः 8139

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT