पिंपरी-चिंचवड

पीएमपी थांब्यांवर सीएनजीची रोज नासाडी

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ ः बस पुन्हा चालू होत नाही या कारणावरुन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस शेवटच्या थांब्यांवर प्रवासी बसमध्ये नसतानाही तास न तास सुरूच ठेवल्या जात आहेत. त्यामुळे थांब्यावरच रोज शेकडो किलो सीएनजीची नासाडी होत असून पीएमपीएमएलच्या तुटीमध्ये वाढ होत आहे. चालक आणि पीएमपी प्रशासनाकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
पीएमपीएमएलकडून दररोज साधारणतः ३८१ मार्गांवर १६५० ते १७०० बसमार्फत सेवा दिली जाते. त्यामधून दररोज आठ ते दहा लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये सध्या १ हजार २४४ सीएनजी बस आहेत. त्यातील ५९५ स्वमालकीच्या आणि ७३० ठेकेदारांच्या बस आहेत. सीएनजी बससाठी सध्या दिवसाला साधारणतः ७३ हजार ६०० किलो सीएनजीचा वापर होतो. तर प्रतिबस प्रतिदिनी सुमारे ६८ ते ६९ किलो सीएनजीचा वापर होत आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यातील अनेक सीएनजी बस जीर्ण झाल्या आहेत. तरीही त्या मार्गांवर सोडल्या जात असल्यामुळे बऱ्याच वेळा ‘ब्रेक डाऊन’ होत आहेत. पीएमपीएमएलचे चालक सीएनजी बस बंद केल्या की पुन्हा सुरू होत नाही म्हणून शेवटच्या थांब्यावर प्रवासी बसमध्ये नसतानाही तास न तास बस सुरूच ठेवत आहेत. त्यानंतर ते लघुशंका, जेवण किंवा नाष्टा करण्यासाठी जात आहेत.

सीएनजी खर्चात वाढ
पीएमपीएमएलच्या सीएनजीवरील खर्चात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. सध्या महिन्याला सुमारे २० कोटी रुपये आणि वर्षाला २२८ कोटी रुपये खर्च सीएनजीवर होत आहे. संचलन तुटीत वाढ होत आहे म्हणून तिकीट दरवाढ केली. पण, दुसरीकडे दिवसाला शेकडो किलो सीएनजीची थांब्यावरच नासाडी होत आहे. चालकांच्याही तक्रारींत तथ्य असल्यास त्याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे बनले असून सुस्थितीमधील बस मार्गावर सोडण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे इंधन खर्चातही बचत होण्यास मदत होणार आहे. मात्र, त्याकडे पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

बस पळवल्याचा प्रकार
२०१५ मध्ये पुण्यातील मार्केट यार्ड येथून रात्री पावणेदोनच्या सुमारास पीएमपीएमएलची चोरलेली बस नाशिकजवळील शिंदे या गावात आढळून आली होती. तसेच बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती. बसमध्ये चावी असल्याने चोरट्याने बस पळवली. ही बस मार्केट यार्ड परिसरात सोडून चोरटा पसार झाल्याची घटना जून २०२३ मध्ये घडली होती. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नसून अजूनही ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच स्थिती पाहायला मिळते.

सीएनजीची माहिती दृष्टीक्षेपात (किलोमध्ये)
२०२२-२३ /२०२३-२४ /२०२४-२०२५
स्वमालकीच्या बससाठी वापर / १,५७,५९,२१४/ १,४८,५९,७८२/ १,५२,२८,६३३
भाडेतत्वावरील बससाठी वापर / २,६३,०२२/ ६,०६,४६७/ १,१८,४६,५१५
एकूण वापर / १,६०,२२,२३६/ १,५४,६६,२४९/ २,७०,७५,१४८
सीएनजीचे दर - ८८ रुपये
सीएनजीवर होणारा वार्षिक खर्च - २२८ कोटी
स्वमालकीच्या सीएनजी बस - ५९५
ठेकेदाराच्या सीएनजी बस - ७३०
सीएनजी एकूण बस - १,३२५

बसथांब्यांवर बस सुरू न ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. पण, तरीही बस सुरू ठेवत असतील; तर संबंधित चालकांवर कारवाई करण्यात येईल.
- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT