पिंपरी, ता. १४ ः पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांना लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे कविराज उद्घव कानडे आणि डॉ. अशोक शीलवंत स्मृती स्नेहबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राळेगण सिद्धी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राजू तनवाणी, प्रकाश कुंभार यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. यावेळी कल्पना शीलवंत, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. पांडुरंग भोसले यांनी, ‘समाजासाठी जीवन समर्पित केलेल्या आदरणीय विभूतीच्या हस्ते सन्मानित झाल्यामुळे मनात कृतार्थतेची भावना आहे,’ अशी भावना व्यक्त केली. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संगीता अहिवळे यांनी आभार मानले.
-----