पिंपरी, ता. १४ ः महापालिकेतर्फे आठही क्षेत्रीय कार्यालयांत आयोजित जनसंवाद सभेत ७५ तक्रार वजा सूचना नागरिकांनी मांडल्या. यामध्ये प्रस्तावित डीपी रस्ते, शालेय विद्यार्थ्यांसाठी पीएमपी बससुविधा उपलब्ध करून देणे, बाजारपेठांतील वाहतूक कोंडी दूर करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, कीटकनाशक फवारणी करणे, उद्यानातील खेळण्यांची दुरुस्ती करणे, नाले सफाई करणे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे आदींचा समावेश होता. शहरातील समस्या सोडविण्यासाठी महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या सोमवारी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते. नागरिकांनी त्यात तक्रार वजा सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
--