Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

How to make beetroot moong sprouts chilla at home: प्रोटीन आणि चवीनं भरलेला हा बीट-स्प्राऊट्स चिला सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय आहे!
Beet Sprouts Chilla Recipe
Beet Sprouts Chilla Recipesakal
Updated on

Quick protein-rich chilla recipe for weight loss: सकाळचा नाश्ता फक्त पोट भरण्यासाठी नको, तर तो आरोग्यदायी, चविष्ट आणि आकर्षक असावा, असं सगळ्यांनाच वाटतं. मग तो आवडत्या भाजीचा पराठा असो की काहीतरी झटपट आणि वेगळं. अशीच एक रंगीबेरंगी, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत – बीट-स्प्राऊट्स चिला!

प्रोटीनने भरलेली ही रेसिपी वजन कमी करण्यात, पचन सुधारण्यात आणि दिवसभरासाठी ऊर्जा देण्यात मदत करते. यात ताज्या भाज्या, डाळी आणि मसाले यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

चला, बघूया ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी कशी तयार करायची:

साहित्य

  • १½ कप मूग व चणा स्प्राऊट्स

  • १ मध्यम आकाराचा बीट (सोलून कापलेला)

  • २ हिरव्या मिरच्या

  • १ इंच आल्याचा तुकडा

  • २-३ लसूण पाकळ्या

  • ¼ टीस्पून जिरे

  • ½ टीस्पून हळद

  • ½ टीस्पून गरम मसाला

  • ½ टीस्पून आमचूर पावडर

  • चवीनुसार मीठ

  • ४–५ टेबलस्पून बेसन (चणापीठ)

  • १–२ टेबलस्पून तीळ (वरून भुरकण्यासाठी)

  • गरजेनुसार पाणी

  • थोडं तेल (तवा ग्रीस करण्यासाठी)

कृती

  1. मिक्सरमध्ये स्प्राऊट्स, बीट, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि सर्व मसाले एकत्र करून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

  2. या मिश्रणात बेसन घालून एकसंध पिठ तयार करा. पिठ फार घट्ट किंवा पातळ नको.

  3. नॉनस्टिक तवा गरम करून थोडंसं तेल लावून घ्या.

  4. चमच्याने पिठ तव्यावर पसरवा आणि वरून तीळ भुरका.

  5. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

  6. गरमागरम चिला तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टीप

चिला परतताना तुटत असेल, तर २ चमचे रवा किंवा तांदळाचं पीठ घातल्यास टेक्स्चर सुधारते आणि बाइंडिंग चांगलं होतं.

ही रेसिपी केवळ नाश्त्यासाठीच नव्हे, तर दुपारच्या हलक्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठीही योग्य आहे. नैसर्गिक रंग, चव आणि पोषणमूल्य यांचा सुंदर मिलाफ म्हणजे हा बीट-स्प्राऊट्स चिला – तुम्ही एकदा खाल्ला, की पुन्हा पुन्हा बनवायला उत्सुक व्हाल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com