पिंपरी-चिंचवड

हिंजवडी, मारुंजी, माणमध्ये पीएमआरडीएकडून रस्त्यांचे सर्व्हेक्षण

CD

पिंपरी, ता. १६ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) हिंजवडी, मारुंजी, माण या तिन्ही ठिकाणी रस्त्याचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील अडथळा ठरणारे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. त्यानंतर होर्डिंगदेखील काढण्यात येणार आहे. तसेच, नाल्यासंबंधित स्वतंत्र विभाग काम करत आहे. गुरुवारपासून (ता. १७) ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
हिंजवडी येथे वाहतूक कोंडीच्‍या समस्या मोठ्या झाल्‍या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर सर्वच विभाग खडबडून जागे झाले आहेत. त्यामध्ये विशेषतः पीएमआरडीएकडे मोठी जबाबादारी सोपविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दोन दिवसांपासून पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे हिंजवडी दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी मुख्यतः वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती गोळा करण्यात आली असून, गुरुवार (ता. १७) अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाने सांगितले.
नाल्याचा प्रवाह बंद केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात यांपैकी काही जागांवर पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागाने बांधकामास मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करताना समस्या येत आहेत. इतर नाल्यांवर कंपन्या उभारल्या गेल्या आहेत. यावर प्रत्‍यक्ष कारवाईला लवकरच सुरुवात करणार असल्‍याचे अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागाकडून सांगण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Mumbai Rain Update : मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट! हवामान खात्याने दिली महत्त्वाची अपडेट, पहाटेपासून शहरात ढगाळ वातावरण

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Latest Maharashtra News Updates : मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT