पिंपरी-चिंचवड

वायसीएम रुग्णालय, संत तुकारामनगर

CD

उपचार सुविधा मुबलक;
यंत्रणेतील त्रुटीमुळे मनस्ताप

पिंपरी : केसपेपरसाठी रांगा, डॉक्टरांच्या केबिनबाहेर शिस्तीत बसलेले रुग्ण व नातेवाईक, त्यांची डॉक्टरांकडून विचारपूस आणि योग्य सल्ला असे दिलासादायक चित्र महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) बाह्यरुग्ण विभागात पाहायला मिळाले.
विविध व्याधींनी ग्रस्त रुग्ण आणि नातेवाईक सोमवारी (ता. २१) सकाळी नऊपासूनच आले होते. पण, ओपीडीचे दिशादर्शक फलक आणि माहिती देणारी योग्य यंत्रणा नसल्याने रुग्ण व नातेवाइकांची धावपळ दिसली. यामुळे रुग्णांना शोधाशोध करावी लागली. केस पेपरसाठी गेलेल्या रुग्णांना ‘सुट्टे पैसे द्या’, नाहीतर ‘राहिलेले पैसे नंतर घेऊन जा’ असा सल्ला मिळत होता. काही रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून बाहेरून घेण्यास सांगत होते. त्यामुळे रुग्णालय सर्व सुविधा उपलब्ध असल्या तरी यंत्रणांच्या त्रुटी दिसून आल्या.

हाताला लागल्याने रुग्णालयात आले. डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी करून औषधे दिली. औषध खिडकीवर मला काही गोळ्या औषधे दिली. उर्वरित बाहेरून घेण्यास सांगण्यात आले. मागच्या वेळेसही काही औषधे बाहेरून घ्यावी लागली.
- पौर्णिमा दौंडकर, रुग्ण

रुग्णालयात स्वच्छता : आहे
बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
रुग्णांची व्यवस्थित तपासणी : होते
औषधे : काही औषधे बाहेरुन घेण्यास सांगतात
सुरक्षा व्यवस्था : आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Earthquake: साखर झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के, लोक घराबाहेर धावत सुटले अन्...

Pune Municipal Corporation: पुणे पालिकेतील गणेश मंडळांच्या बैठकीत गोंधळ

५ अल्पवयीन मुलींसह २५ महिलांचा गर्भपात! सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत; काकाच्या अत्याचाराने १४ वर्षीय पुतणी सहा महिन्यांची गर्भवती, वाचा...

Abhijit Pawar: स्त्रीतत्त्वाला समाजात प्रतिष्ठा हवी, अभिजित पवार, समाज बदलण्याआधी स्वतःला बदला; ‘तनिष्का वकील फोरम’चा कार्यक्रम

Healthy Morning Breakfast Recip : स्लिम आणि फिट राहायच आहे? मूग डाळ चाट नक्की ट्राय करा! लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT