पिंपरी-चिंचवड

महात्मा फुले महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर व्याख्यान

CD

पिंपरी, ता. २१ : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नार्को कोऑर्डिनेशन सेंटर, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या विद्यमाने व्यसनमुक्तीबाबत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. लेफ्टलंट प्रसाद बाठे (एन.सी.सी. अधिकारी) यांनी मनोगत व्यक्त केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा. गणेश भागरे यांनी करून दिला. प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णु श्रीमंगले होते. त्यांनी व्यसनाचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकला. त्यांनी व्यसनाच्या आहारी जाण्याची मानसिक प्रक्रिया, त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक उपाय आणि तरुणांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली.
प्राचार्य प्रा.डॉ.पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांशी संवाद साधत, महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे कार्यक्रम सातत्याने राबवले जातील, असे सांगितले. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण बोरसे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

Shivendraraje Bhosale: साताऱ्यात उभारणार प्रशस्‍त वाहनतळ: शिवेंद्रराजे; राजवाडा परिसरात २५० वाहनांसाठी होणार सोय

India Badminton: भारताचे सहा बॅडमिंटनपटू अपात्र; व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका, जागतिक विद्यापीठ स्पर्धेला मुकले

धक्कादायक प्रकार! 'साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावले'; एकतर्फी प्रेमातून हल्ला, युवकाला चोप अन्..

Chandrashekhar Bawankule: ‘हनीट्रॅप’मधील मंत्र्यांबाबत त्यांनाच विचारा: चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT