पिंपरी-चिंचवड

होळकरवाडी, औताडे हांडेवाडीतील ‘टीपी’ योजनांबाबत शासन सकारात्‍मक

CD

पिंपरी, ता. २२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दाखल केलेल्‍या नगर नियोजन (टीपी-टाऊन प्‍लॅनिंग) प्रस्तावातील होळकरवाडी क्रमांक चार आणि औताडे हांडेवाडी या योजनांना राज्‍य शासनाने हिरवा कंदील दाखविला.
नगररचना विभागाच्या सहा पैकी दोन योजनांना मंजुरी मिळाली. मांजरी कोलवाडी योजना रद्द झाली. विकास आराखडा रद्द केल्‍यानंतर प्रस्‍तावित ‘टीपी’ योजनेला मूर्त रूप मिळत आहे. ‘पीएमआरडीए’ने आपल्या हद्दीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सहा ‘टीपी’ योजना राबविल्‍या आहेत. यामध्ये मुळशी तालुक्‍यातील माण म्हाळुंगे, हवेली तालुक्‍यातील वडाचीवाडी, हांडेवाडी, मांजरी येथे प्रत्‍येकी एक, तर होळकरवाडी येथे दोन ‘टीपी’ योजना राबविण्यात येतील. त्‍यासाठी ‘पीएमआरडीए’ने ३१ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी दिली. राज्‍य शासनाकडे लवादाने २०२३ मध्ये प्रस्‍ताव पाठविला होता.
चार जुलै रोजी प्रस्‍तावित योजनांपैकी होळकरवाडी क्रमांक चारला काही बदलांसह मंजूर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. याच महिन्‍यात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. औताडे हांडेवाडी ही योजनाही मंजूर करण्यात आली. नागरिकांना याबाबत माहिती ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर तसेच संबंधित विभागात एका महिन्‍याच्‍या कालावधीसाठी माहिती उपलब्ध असेल.
मांजरी कोलवाडी योजनेबाबत राज्‍य शासनाकडे काही निवेदने आली होती. त्‍यानुसार चौकशी करून माहिती मिळविण्यात आली. ही योजना सध्या तरी नामंजूर करण्याचे ठरले आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : चौफुला कलाकेंद्रात गोळीबार? पोलिसांना पुरावे मिळेनात, थिएटर मालक म्हणतो, असं घडलंच नाही

धक्कादायक! नागपुरात मध्यरात्री सरकारी हॉस्टेलमध्ये घुसून मुलींचा विनयभंग, ना CCTV, ना पुरेशी सुरक्षा; मोबाईलही पळवले

Mercury Debilitation 2025: 24 जुलैपासून बुध कर्क राशीत होईल अस्त; मिथुनसह 'या' 5 राशींसाठी वाढू शकतात अडचणी, जाणून घ्या परिणाम आणि उपाय

'भारतात मुलगी जन्मली की बंदूक घ्यावी लागेल!' अभिनेत्री रिचा चड्डाची लेकीसाठी काळजी, म्हणाली...'मला फार भिती...'

Who Is Gita Gopinath: कोण आहेत गीता गोपीनाथ? IMFमधील कोट्यवधी रुपयांची नोकरी सोडल्यानंतर हार्वर्डमध्ये परतणार

SCROLL FOR NEXT