पिंपरी-चिंचवड

‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू

CD

पिंपरी, ता. २३ : जिल्हा रुग्णालय नेत्र विभागाच्या वतीने २२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित शिबिराच्या पहिल्याच दिवशी ८८५ जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बी.जे. वैद्यकीय महावि‌द्यालय अंतर्गत रुग्णालय येथे मोहीम होणार आहे. नेत्रशल्य चिकित्सक, निवासी डॉक्टर, भूलतज्ज्ञ, नर्सिंग स्टाफ, नेत्रचिकित्सक, अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
५० वर्षांवरील व्यक्तींना दृष्टिदोष, अस्पष्ट किंवा धुरकट दिसणे, रात्री दिसण्यास अडचण होणे, उजेडाच्या आजूबाजूला झगमग दिसणे, रंग फिकट किंवा पिवळसर दिसणे, एकाच डोळ्यात दोन प्रतिमा दिसणे, वाचन किंवा टीव्ही पाहताना त्रास होणे. अशी लक्षणे असल्यास तत्काळ तपासणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले.
मोहिमेचे उ‌द्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी केले. यावेळी नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. वंदना जोशी, डॉ. विक्रम काकडे, डॉ. प्रज्ञा निकम, डॉ. प्रिया हरिदास, समुपदेशक सीमा हगवणे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा हाहाकार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ; 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

Kolhapu Girls Hit Car : अल्पवयीन मुलाने थेट मुलींच्या घोळक्यात कार घुसवली, एका मुलीचा जागीच मृत्यू तर तिघी गंभीर, असा आहे घटनाक्रम

Beed Accident: ऊसतोड मजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या बाळू आणि लता वायकर दांपत्याचा एसटी बसच्या धडकेत जागीच मृत्यू

Satara: आमदार शशिकांत शिंदे समर्थक आक्रमक; पोलिस ठाण्यात ठिय्या, ल्हासुर्णेतील निवासस्थानाची बेकायदेशीरपणे चौकशी

Ashadhi Ekadashi Celebration : जय हरी विठ्ठल अमेरिकेत गुरूपौर्णिमा व आषाढी एकादशी उत्सव थाटात साजरा

SCROLL FOR NEXT