पिंपरी-चिंचवड

दीप-अमावस्या

CD

वसंतदादा पाटील शाळेत दीपपूजन

पिंपरी, ता. २७ : नेहरूनगर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयात आषाढ अमावस्या साजरी करण्यात आली. शाळेमध्ये पांरपारिक दिव्यांचे समई, निरंजन, पणती, लामण दिवा प्रज्वलित करण्यात आले. संस्थाध्यक्ष हनुमंतराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका संध्या वाळुंज यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख वडघुले, पठाण यांनी नियोजन केले. त्याचप्रमाणे लक्ष्मण गुरव, सखाराम साबळे, अश्विनी वढघुले, अरमान पठाण, अनिल राठोड, सविता महागंडे या शिक्षकांनी सहकार्य केले.

एसपीएम स्कूलमध्ये दीपपूजन
यमुनानगर निगडी येथील एसपीएम स्कूलमध्ये दीपपूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता सहावीमधील ऋग्वेदिक कुलकर्णी, आरोही देसाई, हसवी वांजरे, अनुश्री कातोरे यांनी दिव्याची प्रार्थना म्हणली. हसवी वांजरे हिने दीपअमावस्येची माहिती दिली. विविध प्रकारचे दिवे विद्यार्थ्यांनी घरून आणले होते त्याची सजावट केली गेली होती. अमृता कर्नल, ज्योती बक्षी, अंजली भाटिया आणि हेमंत बोराडे यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले. शिक्षकांनी नैवेद्यासाठी उकडीचे दिवे करून आणले होते. प्राचार्य पल्लवी शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

SCROLL FOR NEXT