संवाद माझा
विक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा
सामान्य नागरिकांना भुर्दंड
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीच्या रस्त्यावर सतत अतिक्रमणे होतात. एक तर हा रस्ता अतिशय रहदारीचा आहे. येथे सम-विषम तारखांना वाहने लावली जातात. अतिक्रमण केलेले विक्रेते त्यांच्या स्टॉलसमोर स्थानिक नागरिकांना वाहन लावू देत नाहीत. त्यातून वाद होतात. विरुद्ध दिशेला वाहन लावले की वाहतूक पोलिसांची गाडी येते आणि वाहन उचलून नेते. अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांमुळे स्थानिक नागरिकांनी भुर्दंड का आणि तो किती सहन करायचा....या प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागातील अधिकारी सांगू देऊ शकतील का ?
- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर
E२५V३५४५५
चिंचवडमधील एस. के. एफ. हाउसिंग सोसायटीजवळील हॉटेल कामिनी समोरचे हे दृश्य आहे. थोडा पाऊस पडला तरी अशी परिस्थिती असते. मग मुसळधार पाऊस पडला तर विचारायलाच नको....सोसायटीतील लोकांना प्रवेशद्वारातूनच बाहेर पडता येत नाही. लहान मुलांना शाळेत जाताना, ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडचणी येतात. बाजूने वाहन जोरात गेले की घाण पाणी अंगावर उडते. येथील नागरिकांना जीव मुठीत धरूनच जावे लागते. याकडे पालिका प्रशासन लक्ष देईल का?
- मधुकर कांबळे, चिंचवड
PNE२५V३५४५७
महापालिकेने प्रभाग क्रमांक १३ मध्ये बांधलेल्या वृत्तपत्र वाचनालयाची परिस्थिती दयनीय झाली आहे. महापालिकेच्या ‘लोकसंवाद’मध्ये यमुनानगरमधील सर्व वाचनालयांची दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे. यावर कार्यवाहीची प्रतिक्षा आहे.
- बाबा परब, यमुनानगर
PNE२५V३५४५१
----
चिंचवडगावातील केशवनगरमधील आठवडे बाजारालगतच्या पदपथावरील पावसाळी गटारांची झाकणे निखळली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. मुख्य म्हणजे पादचाऱ्यांनाही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची योग्य ती दखल घ्यावी.
- रमेश देव, चिंचवड
PNE२५V३५४५४
---
संत तुकाराम नगर येथील हॉकर झोन तसेच वाय. सी. एम. रस्ता, महेशनगर चौक, मैत्री चौक, एसटी स्टँडचा रस्ता अशा बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांवरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. काही कधी सूरू असतात. याबद्दल ‘ह’ प्रभागाच्या जनसंवाद सभेत अनेकदा लेखी तक्रार केली. त्यानंतरही तक्रारीचे निराकरण करण्यात आलेले नाही. मनपा प्रशासनाने इकडे लक्ष देऊन इथे सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करावा. संपूर्ण संत तुकाराम नगर भागामधील सगळे पथदिवे बदलून मुख्य रस्त्यांवर योग्य प्रकाशव्यवस्था करण्याची खबरदारी घ्यावी. त्यामुळे अंधारात होणाऱ्या पेट्रोल चोऱ्या तसेच इतर गुन्हे बंद होतील. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची भीती सुद्धा कमी होईल.
- योगेश शहा, संत तुकाराम नगर
NE२५V३५४५६
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.