संवाद माझा
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी
चिंचवड गावातून येताना धनेश्वर पूल संपल्यावर डाव्या बाजूला मोठ्या खड्ड्यात नागरिक सर्व प्रकारचा कचरा टाकतात. खड्यात असल्याने पालिका सेवकांना कचरा काढता येत नाही. तेथे दुर्गंधी पसरली आहे. रोगराईमुळे आरोग्य धोक्यात येते. लोखंडी जाळी बसवल्यावर सुधारणा होईल पालिकेने दखल घ्यावी. येथे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
- रमेश पाटील, चिंचवडगाव
PNE25V37188
विजेच्या खांबाचे झाकण उघडे
आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या पीएमपी बस स्टॉपशेजारी असलेले विजेच्या खांबाचे झाकण उघडे आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने तातडीने या खांब्यावर सुरक्षेचे झाकण बसवावे. या ठिकाणाहून हजारो प्रवासी पीएमपीने मनपा, कात्रज, निगडी या ठिकाणी प्रवास करतात.
- उदय पाटील, निगडी
PNE25V37187
चार महिन्यांपासून राडारोडा पडून
विष्णुदेवनगर पुनावळे येथील आकाशजन पार्कजवळील पदपथावरती गेले तीन-चार महिने राडारोडा पडला आहे. शिवाय काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय आजूबाजूलाच चिखलाचे साम्राज्य आहे. याकडे महानगरपालिका लक्ष केव्हा देणार?
- कमलाकर कुलकर्णी, पुनावळे
E25V37186
नदी काठाजवळ कचऱ्याचा ढीग
चिंचवडगावात केशवनगर येथील स्पाईन रोड नदी काठाजवळ कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. रस्त्यावरच कचरा आलेला आहे. येथील नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीमध्येच टाकावा. महापालिकेच्या आरोग्य खात्याने निदान दिवसाआड कचरा उचलावा. स्पाइन रोडवर सकाळ आणि सायंकाळी नागरिक फिरायला येत असतात. त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. म्हणून हा परिसर स्वच्छ करण्यात यावा.
- रमेश देव, चिंचवड
PNE25V37185
वाकड दत्तमंदिर परिसरात अस्वच्छता
वाकड दत्त मंदिर रोडवर जागोजागी पाइप, सिमेंटचे गट्टू, सिमेंटचे दुभाजक, विजेचे खांब, टाकाऊ साहित्य रोडवर अनेक महिन्यांपासून पडून आहेत. त्यामुळे तेथे घाण, कचरा होत आहेत. डासांची उत्पत्ती होत आहे. वाहतुकीस अडचण येत आहे. या ठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिकेने या परिसराची स्वच्छता करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाय करावेत.
- दि. च. बाफना, वाकड
Id: PNE25V37184
मोकाट श्वानांमुळे भीतीचे वातावरण
कस्पटे चौकात मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः कचरा आणि मांसविक्री दुकानांजवळ कुत्र्यांचा जास्त वावर असतो, असे दिसते. पादचाऱ्यांचे अंगावर हे श्वान भुंकत असतात. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.
- अशोक लालगुणकर, वाकड
PNE25V37133
निगडी परिसरात नेहमीच अस्वच्छता
निगडीतील दिवंगत महापौर मधूकर पवळे उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले आहेत. निगडी बसस्टॉपसमोरील भुयारी मार्गात कायमस्वरुपी अस्वच्छता असते. काही बेजबाबदार लोक तेथे मूत्रविसर्जन करतात. त्यामुळे दुर्गंधीत वाढ होत आहे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी येथे दररोज स्वच्छता करतात; पण तरीही तेथे पुन्हा अस्वच्छता केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार दिसून येतात. नागरिक आपल्या जबाबदाऱ्या आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेत नाही, तोपर्यंत असेच चालणार आहे.
-शिवराम वैद्य, निगडी
E25V37183
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.