पिंपरी-चिंचवड

‘फटाके’बाज दुचाकीस्वारांवर कारवाईने ‘ब्रेक’

CD

मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १५ : दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मागील वर्षभरात सुमारे ५ हजार ६४६ वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल ५६ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे.
वाहनांचे मूळ भाग बदलून नवीन बसवणे नियमबाह्य आहे. तरीही, काही दुचाकीचालक सायलेन्सच्या रचनेत बदल करतात, किंवा मोठा आवाज यावा, अशी यंत्रणा बसवतात. शहरात बऱ्याचदा फटाक्यासारखा आवाज येणाऱ्या दुचाकी दिसतात. अशा दुचाकींमुळे ध्वनिप्रदूषण होते. सोबतच रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालय परिसरात या आवाजामुळे नागरिकांना त्रास सहन करवा लागतो. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने विविध वाहतूक विभागांतर्गत अशा बेशिस्त वाहनचालकांवर फेब्रुवारी २०२४ ते २०२५ या कालावधीत धडक कारवाई करत दंड वसूल केला आहे.

अपघाताचा धोका
दुचाकी चालकाने सायलेन्सरमधून अचानक मोठा आवाज निर्माण केल्यास शेजारील इतर दुचाकीचालक गोंधळतात. यामुळे त्यांचे नियंत्रण सुटून अपघाताचा धोका वाढतो. तसेच, पादचाऱ्यांबाबतही असेच घडते. अचानक मोठा आवाज कानावर पडल्यास पादचारी गोंधळतात. तोपर्यंत हे बेशिस्त दुचाकीचालक तेथून निघूनही जातात.


दुचाकीला नियमाप्रमाणेच सायलेन्सर असावेत. मात्र, काही वाहनचालक त्यामध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवितात. तसेच वाहनचालक निर्माण करत असलेल्या आवाजामुळे अक्षरश: कानठळ्या बसतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी.
- करण पिचे, नागरिक

सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्या वाहन चालकांवर नियमित कारवाई केली जात आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

फेब्रु. २०२४ ते फेब्रु. २०२५ कालावधीतील सायलेन्सर कारवाई
महिना कारवाई दंड
फेब्रुवारी ६०६ ६,०५०००
मार्च ४५८ ४,५६,०००
एप्रिल ३५० ३,५०,०००
मे २०५ २,०५,०००
जून ३५० ३,४९,०००
जुलै १६८ १,६८,०००
ऑगस्ट २२२ २,२२,०००
सप्टेंबर १९६ १,९६,०००
ऑक्टोबर २९८ २,९८,०००
नोव्हेंबर ४९८ ४,९८,०००
डिसेंबर ४७२ ४,७२,०००
जानेवारी ६२४ ६,२३,०००
फेब्रुवारी ११९९ ११,९८,०००

५,६४६ : कारवाईची वर्षभरातील प्रकरणे
५६, ४०,००० : वसूल करण्यात आलेला दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT