पिंपरी-चिंचवड

रंगमंचावर नव्या साजात रंगणार नाट्य प्रयोग

CD

पिंपरी, ता. ११ ः ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला आजपासून प्रारंभ होत आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लेखक दिग्दर्शक संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर या नाट्यगृहात रात्री नऊ वाजता नाट्य प्रयोग सादर होईल.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ‘ब्रेक’ घेऊन आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्यासाठी आणि निखळ विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम पर्वणी असणार आहे. याद्‍वारे प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख, संदीप पाठक, हृषिकेश शेलार, अनघा भगरे, सुशील इनामदार, चिन्मय माहूरकर, समृद्धी मोहरीर आदी लोकप्रिय कलाकारांची रंगमंचावर गाजत असलेली नाटके शहरातील रसिकांना पाहता येणार आहेत. या नाट्य महोत्सवाचे प्रायोजक ‘मिरॅकल’ हे ग्रुप आहेत.

असे आहे नियोजन
काय : ‘सकाळ’ नाट्य महोत्सव
कुठे : ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण
कधी : १२ ते १४ एप्रिल
किती वाजता : रात्री ९ वाजता

महोत्सवातील नाटके
तारीख व वार / नाटक / कलाकार
१२ एप्रिल, शनिवार / नियम व अटी लागू / संकर्षण कऱ्हाडे व अमृता देशमुख
१३ एप्रिल, रविवार / वऱ्हाड निघालंय लंडनला / संदीप पाठक
१४ एप्रिल, सोमवार / शिकायला गेलो एक / प्रशांत दामले, समृद्धी मोहरीर, चिन्मय माहूरकर, सुशील इनामदार, अनघा भगरे, हृषिकेश शेलार

सवलतीच्या दरात तिकिटे (प्रतिव्यक्ती रुपयांत)
- सीझन तिकीट (तळमजला) : १२००
- प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
- प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

तिकीट बुकिंग सुविधा
ऑनलाइन : book my show
मोबाईल : ८९७५२३७०४१

चिंचवडला तिकीट मिळणार ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या तिकीट खिडकीवर सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत तिकीट विक्री सुरू आहे.

महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : अक्षय ः ९५६१३१४६७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT