पिंपरी-चिंचवड

महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात शहरातील संस्था, संघटना व पक्षांकडून अभिवादन

CD

पिंपरी, ता. ११ ः क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांकडून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उपायुक्त अण्णा बोदडे, गोरक्ष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, नितीन घोलप, देवेंद्र तायडे, अण्णा कुदळे, ॲड. विद्या शिंदे, कविता खराडे, रोहिणी रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने अभिवादन
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, चेतन दुधाळ, सचिन औटे, ज्ञानेश्वर कांबळे, विजय लोखंडे, दीपक साकोरे, संजय औसरमल, अकबर मुल्ला यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT