पिंपरी, ता. ११ ः महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यातील निवासस्थान ‘महात्मा फुले वाडा’ येथे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी भेट दिली आणि अभिवादन केले. महात्मा फुले यांच्यासह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे, बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा फुले यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा सुरू केली. त्याची जबाबदारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. त्यानंतरच्या काळात अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.’’ भारताच्या इतिहासात महात्मा फुले यांचे कार्य अजरामर राहणार आहे. देशाच्या इतिहासातील ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तकांचे हे स्मारक आहे. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो. समाजासाठी काम करण्याचे नवी ऊर्जा मिळाली, अशी भावनाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.
फोटोः 05733
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.